शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा तोड अल्पवयीन मजूर ठरली ‘कुमारी माता’, बलात्कारातून मुलीला जन्म; आरोपीला अटक

By प्रदीप भाकरे | Updated: January 6, 2023 18:15 IST

आरोपी तौसिफ शहा याने तिला लग्नाचे आमिष दिले. आपण लग्न करणारच आहोत, अशा प्रलोभनाला ती भुलली अन्...

अमरावती - संत्रा तोड मजूर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिचे सर्वस्व लुटण्यात आले. त्यातून तिला गर्भधारणा होऊन तिने मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघड झाली. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी ५ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास आरोपी तौसिफ शहा आसिफ शहा (१९, रा. ब्राम्हणवाडा थडी) याच्याविरूध्द बलात्कार, पोक्सो व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, पिडित १६ वर्षीय मुलगी ही संत्रातोड मजूर आहे. तर आरोपी देखील मजूर आहे. मागील वर्षी सुरूवातीला त्या दोघांमध्ये ओळख झाली. परस्परांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. अधूनमधून त्यांच्यात भेटी देखील होऊ लागल्या. अशातच आरोपी तौसिफ शहा याने तिला लग्नाचे आमिष दिले. आपण लग्न करणारच आहोत, अशा प्रलोभनाला ती भुलली. काही भेटीदरम्यान आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २० मार्च २०२२ पुर्वी हा प्रकार घडला. दरम्यान त्यातून ती गर्भवती राहिली.

असे फुटले बिंग -त्या षोडशीने बलात्कार व गर्भधारणेची बाब कुटुंबियांकडून दडवून ठेवली. दरम्यान ४ जानेवारी रोजी त्या अल्पवयीन मुलीची घरातच नैसर्गिक प्रसुती झाली. तिने स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. प्रसुतीनंतर तिला सलाईनची गरज भासल्याने गावातीलच एका डॉक्टराकडे नेण्यात आले. दरम्यान, ती माहिती अंगणवाडी सेविकेने चाईल्डलाईनला दिली. चाईल्डलाईनने संबंधित गाव गाठून पिडिताची भेट घेतली. तिच्याकडून संपुर्ण आपबिती जाणून घेतली. त्याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. पिडिताच्या जन्मतारखेचा दस्तावेज तपासण्यात आला. अखेर त्याबाबत पिडिताच्या आईने तक्रार नोंदविली. सध्या पिडिता व तिचे नवजात अर्भक फिर्यादी महिलेकडे आहे.

चाईल्डलाईनने आम्हाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून वस्तुस्थिती जाणून घेतली. गुरूवारी रात्री आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.- पंकज दाभाडे, ठाणेदार, ब्राम्हणवाडा थडी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती