शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सिनेस्टाईल झाले ऑपरेशन किडनॅपर्स, वॉन्टेड आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 02:14 IST

Crime News : व्यापाऱ्याचे अपहरण आणि खंडणी वसूल करून गुजरात तसेच राजस्थानमध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या, तसेच या दोन्ही राज्यांच्या पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेल्या राजस्थानमधील एका खतरनाक गुन्हेगाराच्या मुसक्या बेलतरोडी पोलिसांनी मंगळवारी दुपारी सिनेस्टाईल आवळल्या.

- नरेश डोंगरे  नागपूर - व्यापाऱ्याचे अपहरण आणि खंडणी वसूल करून गुजरात तसेच राजस्थानमध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या, तसेच या दोन्ही राज्यांच्या पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेल्या राजस्थानमधील एका खतरनाक गुन्हेगाराच्या मुसक्या बेलतरोडी पोलिसांनी मंगळवारी दुपारी सिनेस्टाईल आवळल्या.परिमंडल चारचे पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वात बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी सिनेस्टाईल ‘ऑपरेशन किडनॅपर्स’ यशस्वी करून अपहरणकर्त्याला जेरबंद केले. त्याने खंडणीपोटी उकळलेल्या रकमेतील २२ लाखांची रोकडही जप्त केली. मनोज नंदकिशोर व्यास (वय ३४, रा. रामगड, जि. शिखर) असे त्याचे नाव आहे. तो राजस्थानमधील हिस्ट्रिशिटर गुन्हेगार आहे.

मनोज व्यासने त्याच्या ४ साथीदारांसह गांधीधाम गुजरातमधील टिंबर व्यापारी मुकेश अग्रवाल यांचे १९ जानेवारीला अपहरण केले. त्यांना राजस्थानमधील फतेपूर जिल्ह्यात नेले. तेथे त्यांना ओलीस ठेवून जिवे मारण्याचा धाक दाखवला. सुटकेसाठी अग्रवाल यांच्या नातेवाईकांकडून ३५ लाखांची खंडणी उकळली.दरम्यान, या अपहरण आणि खंडणी वसूल कांडाने गुजरात आणि राजस्थानमध्येही प्रचंड खळबळ उडाली. दोन्ही राज्याच्या पोलिसांसोबत दहशतवादविरोधी पथकही (एटीएस) सक्रिय झाले. गुजरात एटीएसने आरोपी मनोज व्यासच्या चार साथीदारांना अटक केली. मात्र, अत्यंत धूर्त गुन्हेगार असलेल्या आरोपी मनोजने गुजरात- राजस्थानच्या तपास यंत्रणेसह सर्वांना गुंगारा देऊन पळ काढला.

 असे सुरू झाले ऑपरेशन...

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे आणि कच्छ-गांधीधामचे पोलीस अधीक्षक मयूर पाटील एकाच बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. त्यामुळे त्यांनी डॉ. शिंदेंना आरोपीचे वर्णन आणि संपर्क क्रमांक कळवला. आरोपीचे मोबाईल लोकेशन आज दुपारी ३ नंतर नागपुरात दिसल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके आणि पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत. पीएसआय विकास मनपिया, एनपीसी गोपाल देशमुख, रमेश रुद्रकार, मनोज साहू आणि तेजराम देवढे यांनी अत्यंत शिताफीने सापळा लावून जबलपूर - हैदराबाद हायवेवर किडनॅपर मनोज व्यासला सिनेस्टाईल जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून आय-१० कार तसेच २२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

गुजरात पोलिसांना गुड न्यूजपोलीस उपायुक्त डॉ. शिंदे, ठाणेदार आकोत यांच्या या प्रशंसनीय कामगिरीचे सर्वत्र काैतुक होत आहे. येथील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गुजरात पोलिसांनाही आरोपी मनोज व्यासला अटक केल्याची गुड न्यूज देण्यात आली आहे. लवकरच तेथून पोलीस पथक नागपुरात पोहोचणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक