शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

केवळ वरिष्ठ, अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार; यंदा पीएसआय ते पीआयची ‘जीटी’ नाही

By जमीर काझी | Updated: October 10, 2022 06:50 IST

गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बदल्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : गेल्या  पाच  महिन्यांपासून रखडलेल्या पोलीस दलातील बढत्या, बदल्या येत्या काही दिवसांत होणार आहेत. मात्र,  वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ  अधिकाऱ्यांच्या  बदल्या होणार आहेत.  उपनिरीक्षक,  एपीआय, पीआय या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा सर्वसाधारण बदल्या (जीटी) यंदा केल्या जाणार नाहीत. निम्मे आर्थिक वर्ष संपल्याने त्यांची काैटुंबिक व कार्यालयीन गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बढतीबरोबरच  बदली आणि निवडणूक आयोगाच्या निकषानुसार परिक्षेत्र व आयुक्तालयांतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत. 

 अधिकारी व अंमलदारांच्या बदल्या दरवर्षी ३१ पर्यंत केल्या जाव्यात,  असे   निर्देश आहेत. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना महामारीमुळे त्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून  दोन वर्षे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये बदल्या केल्या. यावर्षीही  राज्यातील राजकीय अस्थिरता आणि त्यानंतरचे सत्तांतर नाट्य, पावसाळा, गणेशोत्सव, नवरात्रीमुळे पोलिसांच्या बदल्या रखडल्या आहेत. आयपीएस संवर्गातील ज्या पोलीस उपायुक्त, अधीक्षकापासून ते अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांना तेथून हलविण्यात येईल, त्याचप्रमाणे प्रलंबित बढतीही त्वरित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढतीचे आदेश जारी होतील, असे सूत्रांनी सांगितले. 

रिक्वेस्ट ट्रान्सफरही मोजक्याचपीएसआय ते पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी जे काही अत्यंत गरजू असतील, अशा काही मोजक्याच विनंती बदली (रिक्वेस्ट ट्रान्सफर)  आवश्यकतेनुसार केल्या जाणार आहेत. नवी मुंबई, पुणे, एसआयडी, नागपूर पोलीस आयुक्तांसह  कार्यकाळ पूर्ण झालेल्या सहआयुक्त, आयजी, उपायुक्त तसेच १५ वर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या जातील.

रश्मी शुक्ला यांची ‘घरवापसी’ निश्चितकेंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या ज्येष्ठ आयपीएस रश्मी शुक्ला यांनी घरवापसी निश्चित मानली जाते. ‘फोन टॅपिंग’प्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेला त्यांच्याविरुद्धचा क्लोजर रिपोर्ट’ हा त्याचाच एक भाग आहे. त्यांना मुंबईचे आयुक्तपद वगळता अन्य मोठे पद किंवा त्यांच्यासाठी विशेष पदाची निर्मिती होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. .. ..

टॅग्स :Policeपोलिस