लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन स्पीकर खरेदीची ऑर्डर देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. आरोपीने निकृष्ट स्पीकर पाठवले. ते परत केल्यानंतर रक्कम परत करण्याची बतावणी करून सायबर गुन्हेगाराने पीडित तरुणाला एक लिंक पाठविली. त्या लिंकच्या आधारे पुन्हा ३७ हजार रुपये काढून घेतले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली.भागेश चंद्रभान राऊत (वय २१) असे तक्रार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो हिंगणा मार्गावरील लोकमान्य नगरात राहतो. ११ ऑक्टोबरला दुपारी त्याने मोबाईलवर स्पीकर डॉट कॉम ही जाहिरात बघितली. कमी रकमेत चांगले स्पीकर देण्याचा जाहिरातीतील दावा बघून भागेशने ९६४१६०८४२८ आणि ९२१२३०४२४२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावरून त्याने जेबीएल कंपनीचे दोन स्पीकर बुक केले. १४ ऑक्टोबरला त्याला पार्सल मिळाले. स्पीकरवर ब्रँण्डचे नाव स्पष्ट दिसत नव्हते. आवाजही चांगला येत नव्हता. त्यामुळे त्याने कस्टमर केअर क्रमांक ९६४१६०८४२८ वर १५ ऑक्टोबरला संपर्क करून तक्रार नोंदवली. पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला तुमची रक्कम परत मिळेल, असे सांगून एक लिंक पाठविली. आरोपीने सांगितल्याप्रमाणे भावेशने त्याच्या बँक खात्याचे शेवटचे चार नंबर आणि यूपीआय पीन कोड लिहून ती लिंक रिसेंड केली. दरम्यान, काही वेळेनंतर त्याने आपले बँक खाते तपासले असता आरोपीने त्यातून ३७ हजार रुपये काढून घेतल्याचे उघडकीस आले. आपली सायबर गुन्हेगाराकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने भावेशने लगेच बँक अधिकाऱ्यांशी तसेच पोलिसांशी संपर्क साधला. सायबर सेलने या प्रकरणात तपास केल्यानंतर बुधवारी एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.खाते क्रमांक देणे टाळासायबर गुन्हेगारांच्या टोळ्या नवनवीन क्लृप्त्या शोधून नागरिकांची रक्कम काढून घेतात. नागरिकांनी आपला बँक खाते क्रमांक, पीन कोड, एटीएम नंबर देण्यास स्पष्ट नकार दिल्यास असे गुन्हे टळतात. अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते देऊ नये.
नागपुरात ऑनलाईन शॉपींग महागात पडली : खात्यातून रक्कमही काढून घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 20:59 IST
ऑनलाईन स्पीकर खरेदीची ऑर्डर देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. आरोपीने निकृष्ट स्पीकर पाठवले. ते परत केल्यानंतर रक्कम परत करण्याची बतावणी करून सायबर गुन्हेगाराने पीडित तरुणाला एक लिंक पाठविली. त्या लिंकच्या आधारे पुन्हा ३७ हजार रुपये काढून घेतले.
नागपुरात ऑनलाईन शॉपींग महागात पडली : खात्यातून रक्कमही काढून घेतली
ठळक मुद्देनिकृष्ट स्पीकर पाठविले