शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Online Parcel : ऑनलाइन पार्सल उघडताय; व्हिडीओ रेकॉर्डिंग नक्की करा!, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 10:30 IST

Online Parcel : अनेकदा ऑनलाइन वस्तू आल्यानंतर पार्सल फोडल्यावर त्यात मोबाइलऐवजी साबण, कॅमे-याऐवजी वीट किंवा दगड मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पार्सल घेण्यापूर्वी ते पार्सल मागविले तिथूनच आले आहे का, याची तपासणी करावी.

मुंबई : सणासुदीच्या काळात ऑनलाइन पार्सल आल्यानंतर ते उघडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात ऑनलाइन भामटे सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी फेस्टिव्हल ऑफरमध्ये खरेदी केलेल्या वस्तूच्या पार्सलमध्ये भलतीच वस्तू पाठवून ग्राहकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे ऑनलाइन मागविलेले पार्सल उघडताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे गरजेचे आहे. कारण, यातून फसवणूक झाली तर सायबर सेलला तक्रार करताना पुरावे लागतात. त्यामुळे हा व्हिडीओ आपल्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरतो.

पार्सल फोडण्यापूर्वी ही घ्या काळजी अनेकदा ऑनलाइन वस्तू आल्यानंतर पार्सल फोडल्यावर त्यात मोबाइलऐवजी साबण, कॅमे-याऐवजी वीट किंवा दगड मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पार्सल घेण्यापूर्वी ते पार्सल मागविले तिथूनच आले आहे का, याची तपासणी करावी. तसेच पार्सल घेतल्यानंतर ते पार्सल कुरिअर बॉयसमोर किंवा रिटेलरसमोर उघडून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे. 

फसवणूक झालीच तर....ऑनलाइन वेबसाइटवरून मागवलेल्या वस्तूऐवजी भलतीच वस्तू मिळाल्यास सुरुवातीला ज्या कंपनीकडून ती वस्तू मागविली, त्या कंपनीकडे आणि रिटेलरकडे तक्रार करावी. तसेच त्या वस्तूचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तसेच सायबर सेलकडे तो व्हिडीओ सादर करून तक्रार दाखल करावी.दिवाळीच्या काळात विविध ऑफरचे आमिष दाखवत सायबर ठग फसवणूक करत आहेत. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. अधिकृत संकेतस्थळावरूनच व्यवहार करा. तसेच पार्सल उघडताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा, असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

फसवणुकीच्या तक्रारीयंदाच्या वर्षी मुंबईत ऑनलाइन फसवणुकीचे ५०० हून अधिक गुन्हे नोंद करण्यात आले आहे. यापैकी अवघ्या ५० हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडे नोंद असलेल्या आकडेवारीतून समोर येत आहे. 

टॅग्स :onlineऑनलाइनShoppingखरेदी