शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन जुगाराचा नाद जडला भारी; ग्रामसेवकाने कबूल केली ३१ लाखाची चोरी

By युवराज गोमास | Updated: December 5, 2023 17:07 IST

देव्हाडा ग्रामपंचायतीचे प्रकरण : फौजदारी गुन्हा व आरोपींना अटकची मागणी

भंडारा : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक राकेश वैद्य याने ऑनलाइन जुगार खेळण्याच्या नादात चक्क ३१ लाख रूपयांची चोरी केली. यासाठी सरपंच व खंडविकास अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतील विविध खात्यातून पैशाची उचल केली. बींग फुटताच सोमवारला चौकशी अधिकाऱ्यासमक्ष त्याने दोन वर्षांपासून ऑनलाइन जुगाराच्या नादात गैरप्रकार केल्याची कबूली दिली.

प्रकरणी ५ सदस्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली. गैरप्रकारात सरपंच, उपसरपंच, खंडविकास अधिकारी यांच्या सहभागाचा संशय व्यक्त करीत फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.ग्रामसेवक राकेश वैद्य यांच्याकडे देव्हाडा व खडकी ग्रामपंचायतीचा कारभार आहे. देव्हाडा बुज ग्रामपंचायतीच्या बँके खात्यात साईबाबा मंदिर आवार भिंत बांधकामाचे १९ लाख तसेच घरटॅक्स मिळून २९ लाख रुपये जमा होते. त्यापैकी २८ लाख ४० हजार रुपये सरपंचाची बनावट स्वाक्षरी करून उचल केले. तसेच पाणीपुरवठा फंडातून ५० हजार रुपये, तर अमानत फंडातून ७८ हजार रुपयांची उचल केली. तसेच खंड विकास अधिकारी यांचे संयुक्त खाते असलेल्या दलितवस्ती सुधार फंडातील १ लाख ३ हजार रुपयांपैकी एक १ लाख रुपयांची उचल केली.

राकेश वैद्य यास दोन वर्षांपासून ऑनलाइन जुगार खेळण्याचा नाद जडला होता. जुगार खेळण्यासाठी त्याने सन २०२२ पासून बनावट स्वाक्षरी करून पैशाची उचल करण्याचा गोरखधंदा चालविला होता. ग्रामसेवकाचा हा गैरप्रकार सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांना माहिती न देता सुरू होता. अनेकदा सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी पासबुक मागितले असता घरी आहे, नंतर दाखवतो, असे बोलून वेळ मारून नेत होता. दरम्यान साईबाबा मंदिर आवार भिंतीची रक्कम सामान्य फंडात जमा होती. त्या बांधकामाचे चेक साहित्य पुरवठाधारकाने बँकेत लावला असता तो बाउन्स झाला अन् गैरप्रकार उजेडात आला.

बँकेत ९ लाख रूपये केले जमाप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सोमवारला (४ डिसेंबर) पंचायत विस्तार अधिकार बोदेले यांनी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाची चौकशी केली असता ग्रामसेवकाने ऑनलाइन जुगाराच्या नादात गैरप्रकार केल्याचे कबूल केले. त्याचवेळी ९ लाख रूपये बॅकेतील सामान्य फंडात जमा केले. उर्वरीत रक्कम लवकरच जमा करण्याचे लेखी पत्र दिले.

देव्हाडा ग्रामपंचायतमधील गैरप्रकाराप्रकरणी चौकशी केली असता ग्रामसेवकाने परस्पर पैसे काढल्याचे कबूल केले व कबुली पत्र दिले आहे. ग्रामसेवकाने काही रक्कम बँकेत जमा केली आहे. प्रकरणी चौकशी अहवाल वरिष्ठांना सोपविला जाईल.- भिमगिरी बोदेले, पंचायत विस्तार अधिकारी, मोहाडी.

फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करासरपंच व प्रभारी सरपंच यांच्या कार्यकाळातील गैरप्रकार असून खंड विकास अधिकारी यांच्या संयुक्त खात्यातूनही रक्कम काढली गेली आहे. गैरप्रकारात अन्य सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही पाच सदस्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे. आरोपी मोकाट  असून रेकार्डमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याची गरज आहे.- दुर्योधन बोंदरे, ग्रामपंचायत सदस्य, देव्हाडा बुज. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी