शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन चिटिंग : नागपुरात भाजपा प्रसिद्धीप्रमुखाला सायबर गुन्हेगाराचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:13 IST

पॉलिसीची रक्कम परत मिळवून देण्याची थाप मारून एका सायबर गुन्हेगाराने भाजपाचे शहर प्रसिद्धीप्रमुख चंदनगिरी तुलसीगिरी गोस्वामी (वय ५३) यांना ७५ हजारांचा गंडा घातला.

ठळक मुद्देपाच रुपये भरायला लावले अन् ७५ हजार काढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पॉलिसीची रक्कम परत मिळवून देण्याची थाप मारून एका सायबर गुन्हेगाराने भाजपाचे शहर प्रसिद्धीप्रमुख चंदनगिरी तुलसीगिरी गोस्वामी (वय ५३) यांना ७५ हजारांचा गंडा घातला. त्याने मोबाईलवर एक अ‍ॅप पाठवून त्यात पाच रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. पाच रुपये खात्यात जमा करताच ठगबाजाने गोस्वामी यांच्या खात्यातून ७४,५०० काढून घेतले. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या बनवाबनवीप्रकरणी लकडगंज ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला.गोस्वामी छापरूनगरातील ब्रिजधाम कॉम्प्लेक्समध्ये राहतात. त्यांनी २०१६ मध्ये बजाज फायनान्सकडून ४ लाख ४० हजारांचे कर्ज घेतले होते. त्यावेळी त्यांच्या खात्यात कंपनीने ४ लाख १५ हजार रुपयेच जमा केले. या कर्जाची त्यांनी मुदतीच्या आत व्याजासह परतफेड केली. मात्र, घेतलेल्या कर्जात आणि कंपनीने वसूल केलेल्या कर्जात २५ हजारांची तफावत आल्याचे लक्षात आल्याने गोस्वामी यांनी कंपनीकडे त्याबाबत विचारणा केली. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी २५ हजारांची रक्कम विद्या फी असल्याचे सांगितले. हा प्रकार न कळाल्यामुळे गोस्वामी यांनी ती फी नको असे म्हटले. त्यावर कंपनीकडून १० हजार रिकव्हरी पॉलिसी आणि १५ हजार प्रोसेसिंग फी असल्याचे सांगून पॉलिसीची रक्कम परत करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतर आपली पॉलिसीची रक्कम मिळावी म्हणून गोस्वामी प्रयत्नशील होते. १२ सप्टेंबर २०१९ ला त्यांना ९९३३०८७५३१ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. आपण बजाज फायनान्स कंपनीतून वरिष्ठ अधिकारी समीर आशुतोष बिश्वास (रा. पश्चिम बंगाल) बोलतो, असे फोन करणाºयाने सांगितले. तुमच्या लोन पॉलिसीची रक्कम परत काढून देतो, अशी थाप मारून त्याने गोस्वामी यांनी एक अ‍ॅप (लिंक) पाठविली. ती डाऊनलोड करा, त्यानंतर त्या खात्यात केवळ ५ रुपये भरा, नंतर तुम्हाला तुमची रक्कम याच खात्यात वळती केली जाईल, असे सांगितले. गोस्वामी यांनी सरळपणे आपल्या मोर्बाइलवर ती अ‍ॅप डाऊनलोड करून त्यात पाच रुपये ट्रान्सफर केले. पुढच्या पाच-दहा मिनिटातच टप्प्याटप्प्याने गोस्वामी यांच्या खात्यातून ७४,५०० रुपये काढून घेतल्याचे मेसेज त्यांना आले. गोस्वामी यांनी लगेच बँकेत धाव घेतली.अधिकाऱ्यांनी गोस्वामी यांचे बँक खाते फ्रीज केले. त्यामुळे मोठी रक्कम वाचली. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार लकडगंज ठाण्यामार्फत सायबर शाखेत करण्यात आली. पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी तब्बल तीन महिने चौकशी केली. त्यानंतर लकडगंज पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.विविध प्रांतात गेली रक्कमगोस्वामी यांच्या खात्यातील काही रक्कम तेलंगणा, काही नोएडा तर काही रक्कम लखनौच्या व्यापारी प्रतिष्ठानातून पेटीएमच्या माध्यमातून आरोपीने खर्ची घातल्याचे तपासात उघड झाले आहे.

 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीBJPभाजपा