शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण, कारागृह विभागाचे परिपत्रक जारी

By मनीषा म्हात्रे | Updated: October 30, 2023 06:18 IST

कैद्यांच्या मागणीनुसारच निर्णय झाल्याची माहिती

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कारागृहातील कैद्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असतानाच, आहारात कांदा व लसणाशिवाय जेवणाचाही समावेश करण्यात आला आहे. रविवारी कारागृह विभागाने याबाबत परिपत्रक जारी करत सर्व कारागृहांत हे आदेश लागू केले.

कारागृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कारागृह विभागात सुरक्षा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात कैद्यांना  येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. तसेच अमिताभ गुप्ता यांना कारागृह भेटीच्या वेळी मुंबई मध्यवर्ती कारागृहातील काही बंद्यांनी धार्मिक व आरोग्याच्या कारणास्तव स्वयंपाक करताना त्यात कांदा व लसूण याचा वापर करू नये अशी विनंती केली. याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली.

ज्या कारागृह संस्थांना कारागृहात बंद्यांचा आहार तयार करताना साधनसुविधा व कारागृह सुरक्षिततेचा विचार करून सहज शक्य होत असेल, तर कांदा व लसूण न वापरता जेवण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. बंद्यांच्या विनंतीनुसार जे बंदी कांदा व लसूण यांचा वापर न करता तसेच कमी तिखट असलेल्या भाजीची मागणी करत आहेत, अशा कैद्यांना आरोग्याच्या दृष्टीने व आहारविषयक परंपरेचा विचार करून वेगळी भाजी बनवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हे नेमक्या कुठल्या कैद्यांसाठी? असाही सूर काहींकडून येत आहे.

सद्य:स्थिती काय?

     राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत.      सर्व कारागृहांची क्षमता २४ हजार ७२२ कैद्यांची आहे.      सध्या सर्व कारागृहांमध्ये ४१ हजार १९१ कैदी आहेत.     मुंबई, पुणे, ठाण्यातील कारागृहे सर्वाधिक गर्दीचे आहेत.      नुकतेच ३० वर्षांवरील कैद्यांसाठी जाड अंथरूण देण्याचा निर्णय कारागृह विभागाने घेतला.

कैद्यांच्या मागणीनुसार निर्णय

कारागृहातील भेटीदरम्यान अनेक कैद्यांनी कांदा व लसणाशिवाय जेवण देण्याची विनंती केली. त्यानुसार, अन्य जेवणाबरोबर या जेवणाचाही आहारात समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून भविष्यात कैद्यांच्या आहाराविषयी तक्रारी कमी होतील.- अमिताभ गुप्ता, अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह 

टॅग्स :jailतुरुंगonionकांदा