ढोल वाजवतांना एकावर केला कुऱ्हाडीने हल्ला, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

By मनोज शेलार | Published: May 5, 2023 05:27 PM2023-05-05T17:27:01+5:302023-05-05T17:27:20+5:30

नंदुरबार : सार्वजनिक कार्यक्रमात ढोल वाजवत असताना, जमावाने अचानक येऊन एकास कुऱ्हाड, तारा गुंडाळलेला दांडका याने जबर मारहाण केल्याची ...

One was attacked with an ax while playing drums, a case was registered against eight people | ढोल वाजवतांना एकावर केला कुऱ्हाडीने हल्ला, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

ढोल वाजवतांना एकावर केला कुऱ्हाडीने हल्ला, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

googlenewsNext

नंदुरबार : सार्वजनिक कार्यक्रमात ढोल वाजवत असताना, जमावाने अचानक येऊन एकास कुऱ्हाड, तारा गुंडाळलेला दांडका याने जबर मारहाण केल्याची घटना धडगाव तालुक्यातील तोरणमाळचा विंददेवपाडा येथे घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तोरणमाळचा विंददेवपाडा येथील सुदाम चौधरी व काहऱ्या गोमदा नाईक यांच्यात जुन्या भानगडीचा वाद होता, त्या वादातून ही मारहाण झाली. सुदाम चौधरी हा इंदल सणात ढोल वाजवीत असताना तेथे आठ ते दहा जण आले. त्याला मागील भानगडीचा जाब विचारत मारहाण केली. कुऱ्हाड, तारा गुंडाळलेला दांडका, लाठ्याकाठ्यांनी त्याला जबर मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. चौधरी यांच्या फिर्यादीवरून काहऱ्या गोमदा नाईक (३५), जहागऱ्या गोमदा नाईक (३३), मनोज गोमदा नाईक (३१), गोमदा तिडक्या नाईक (६५), शिवराम काहऱ्या नाईक (२१), सुमा काहऱ्या नाईक (१९), मुक्शा जहागीर नाईक (१९), सर्व रा. तोरणमाळ यांच्याविरुद्ध म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार किशोर बडगुजर करीत आहेत.
 

Web Title: One was attacked with an ax while playing drums, a case was registered against eight people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.