शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या स्कूटरला आग लावली; ती वाचली, पण सात जणांनी प्राण गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 08:07 IST

रात्री या भागातील वीज गेली होती. वीज आल्यानंतर आग लागली. एमसीबी बाॅक्समध्ये पहिल्यांदा आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज होता. नंतर मात्र हा घातपात असल्याचा संशय आहे.

इंदूर : शहरातील दोन मजली इमारतीत शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत सातजण मृत्युमुखी पडले असून, आठजण गंभीररीत्या भाजले आहेत. मृतांमध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये आधी आग लागली. तेथून ती इमारतीत पसरली.  त्यात काहीजण जिवंत जाळले गेले, तर काहीजण गुदमरले. पळण्यास जागा नसल्यामुळे लोकांनी गॅलरीतून उड्या मारल्या. त्यात काहीजण जखमी झाले. या अग्निकांडामागे एकतर्फी प्रेमाचा अँगल समोर आला आहे. 

रात्री या भागातील वीज गेली होती. वीज आल्यानंतर आग लागली. एमसीबी बाॅक्समध्ये पहिल्यांदा आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज होता. नंतर मात्र हा घातपात असल्याचा संशय आहे. अग्निशामक दलाचे बंब उशिरा आल्यामुळे हानी जास्त झाली, असे स्थानिकांनी सांगितले.मृतांमध्ये ईश्वरसिंह सिसोदिया (वय ४५) त्यांची पत्नी नीतू सिसोदिया (४५), आशिष (३०), गौरव (३८) आणि आकांक्षा अग्रवाल (२५) यांचा समावेश आहे. आणखी दोनजणांची ओळख पटू शकलेली नाही. 

 युवकाने लावली आगया इमारतीचे मालक इन्साफ पटेल यांच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शुक्रवारी रात्री २.५४ वाजता एक युवक पार्किंगमध्ये येताना दिसतो. तो एका वाहनातून पेट्रोल काढतो, आग लावून निघून जातो, असे दिसत आहे. इमारतीतील सीसीटीव्ही मात्र पूर्णत: जळून खाक झाला आहे. हा तरुण शुभम दीक्षित उर्फ संजय (27) आहे. तो या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्याला त्याच इमारतीतील एका तरुणीशी लग्न करायचे होते, परंतू तिचे दुसरीकडे लग्न ठरविण्यात आले. याचबरोबर काही दिवसांपूर्वी या तरुणाचे त्या मुलीशी पैशांवरून भांडण झाले होते. त्याने आग लागली तेव्हा ती तरुणी त्याच इमारतीत होती, परंतू ती सुखरुप आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :fireआग