शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट टीव्ही संचांची विक्री करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 04:36 IST

नामांकित कंपन्यांच्या बनावट टीव्ही संचाची हुबेहूब निर्मिती करून त्यांची विक्री करणाऱ्या अजय सिंह (४०, रा. पलावा सिटी, डोंबिवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बुधवारी अटक केली.

ठाणे  - नामांकित कंपन्यांच्या बनावट टीव्ही संचाची हुबेहूब निर्मिती करून त्यांची विक्री करणाऱ्या अजय सिंह (४०, रा. पलावा सिटी, डोंबिवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून ६० टीव्ही संचांसह इतर सामग्री असा पाच लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.नामांकित ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट टीव्हीची निर्मिती करून त्याची विक्री सुरूअसल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे बनावट टीव्हीची निर्मिती करून विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. अशाच एका व्यक्तीची फसवणूक झाल्याने त्याने याप्रकरणी २० मार्च रोजी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणाचा समांतर तपास वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाकडून करण्यात येत होता. भिवंडीच्या काल्हेर येथील एका दुकानात बनवलेल्या टीव्ही संचांना नामांकित कंपन्यांचे लेबल लावून त्यांची विक्र ी करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि श्रीनिवास तुंगेनवार आणि जमादार बाबू चव्हाण आदींच्या पथकाने काल्हेर येथील एचबी इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अ‍ॅप्लायन्स या दुकानांवर २० मार्च रोजी छापा टाकला असता हा प्रकार उघडकीस आला.पोलिसांनी दुकान मालक अजय सिंह याची चौकशी केली असता, एका सॉफ्टवेअरद्वारे नामांकित टीव्ही कंपन्यांचे सिम्बॉल अपलोड करून ते दुकानात बनवलेल्या टीव्ही संचांना लावल्याचे त्याने सांगितले. हे बनावट टीव्ही संच नामंकित कंपन्यांचे असल्याचे भासवून त्यांची विक्र ी केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे ६० बनावट टीव्ही संच आणि सामग्री हस्तगत केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी