शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाने पैसे देणार्‍या सावकराला अटक; कोंढव्यातील ११ व्या मजल्यावरुन फेकून खुनाचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 16:17 IST

व्याजाने पैसे देताना तारण म्हणून ठेवतो त्यांची मौल्यवान चिजवस्तू, वाहने

ठळक मुद्देसोसायटीच्या ११ व्या मजल्यावरुन फेकून देऊन केला होता खून

पुणे : व्याजाने दिलेले पैसे परत न केल्याबद्दल तिघा जणांनी तरुणाला ११ व्या मजल्यावरुन फेकून देऊन खुन केला होता. या प्रकरणात व्याजाने पैसे देणार्‍या सावकराला कोंढवापोलिसांनीअटक केली आहे.सुहास शरद धांडेकर (वय ३०, रा. कोंढवा बु़) असे या सावकराचे नाव आहे. सुहास धांडेकर याच्याविरुद्ध व्याजाने दिलेले पैसे परत न दिल्याबद्दल मारहाण केल्याचा गुन्हा कोंढवा पोलिसांकडे दाखल आहे.सुहास धांडेकर हा सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांना महिना १० टक्के व्याजाने पैसे दिले आहेत. तसेच त्यांना व्याजाने पैसे देताना तारण म्हणून त्यांची मौल्यवान चिजवस्तू, वाहने ठेवतो.अभिनव नारायण जाधव, अक्षय गोरडे आणि तेजस गुजर यांनी कुल उत्सव सोसायटीच्या ११ व्या मजल्यावरुन फेकून देऊन सागर चिलेवरी याचा खुन केला होता. हा प्रकार १० मार्च रोजी मध्यरात्री पावणे दोन वाजता घडला होता. आरोपी अभिनव जाधव याच्याकडून सागर चिलेवरी याने १५ हजार रुपये व्याजाने पैसे घेतले होते. पैसे व व्याज परत देत नाही, या कारणावरुन तिघांनी सागर याला स्वारगेट येथून मोटारसायकलवर बसवून कुल उत्सव सोसायटीत आणले होते. तेथे मारहाण करुन त्याला ११ व्या मजल्यावरुन ढकलून देऊन त्याचा खुन केला होता.या प्रकरणात आरोपी व साक्षीदारांनी दिलेल्या माहितीवरुन या गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल धांडेकर याच्या सांगण्यावरुन साक्षीदारांनी घटनास्थळावरुन हलविली होती़. त्यामुळे धांडेकर याने गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निष्पन्न झाले़ पोलिसांनी तांत्रिक पुरावा, बँक स्टेटमेंट प्राप्त करुन घेतले़ त्यावरुन धांडेकर याला अटक केली आहे. आरोपी शरद धांडेकर याने अनेकांना व्याजाने पैसे दिले आहेत. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. ज्यांना शरद धांडेकर याने व्याजाने पैसे दिले आहेत़ व चिजवस्तू तारण म्हणून ठेवल्या आहेत. त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, हवालदार भोसले, गवळी, नाईक,कांबळे, कुंभार, पांडुळे, वणवे, शेख, मिसाळ यांनी केली आहे.

टॅग्स :KondhvaकोंढवाMurderखूनPoliceपोलिसArrestअटक