शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाम्बेरी येथे आपसी वादातून वडील आणि मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 14:36 IST

Crime news : आपसी वादातून हे हत्याकांड घडले आहे.

तेल्हारा  : आजची सकाळ अकोला जिल्ह्यासाठी रक्तरंजित निघाली असून तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भांबेरी या गावात आपसी वादातून वडील आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. यात वडिलांच्या जागीच मृत्यू झाला, तर गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तेल्हारा तालुक्यातील भांबेरी गावात सुत्रांनकडून मिळालेल्या माहिती नुसार भांबेरी येथील देविदास भोजने आपल्या परिवारासोबत राहतात.  गावात आपसी वाद बऱ्याच वर्षापासून सुरू होता. आज पहाटेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेल्याने अंदाजे ७० वर्षीय देविदास भोजने यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबरदस्त प्रहार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या देवीदास भोजने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर देविदास भोजने यांचा मुलगा तीस वर्षीय अजय भोजने याला देखील जबर मारहाण करण्यात आली. त्या अवस्थेत पडलेल्या अजय भोजने याला तात्काळ उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणले असता स्थानिक डॉक्टरांनी अकोला रुग्णालय येथे हलवण्याचे सांगितले. सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तेथे अजयचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेत तीन संशयित आरोपीला अटक केली असून नेमकी ही हत्या कोणी व का केली याचा तपास सुरू आहे. आज सकाळी घडलेल्या या हत्याकांडाने येणारा परिसर हादरून आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीTelharaतेल्हारा