शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या परदेशी सिगारेट जप्त; डीआरएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 21:47 IST

चिराबाजारातून एकाला अटक

ठळक मुद्दे कार्गो कुरियर कंपनीद्वारे हा माल दिल्लीतून रेल्वेने मुंबईत आणण्यात आला असल्याची माहिती होती.परदेशी सिगारेटीच्या तस्करीमध्ये दिल्लीतील टोळी सक्रीय असून बिपीन सिंग याच्या सहकाऱ्यांचा शोध सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरए) पथकाने काळबादेवी येथील चिरा बाजारमधील एका गोदामात सोमवारी छापा टाकून एक कोटी एक लाख रुपये किंमतीच्या परदेशी बनावटीच्या सिगारेट जप्त केल्या. मणिपूरातून दिल्लीमार्गे ६० बॉक्समधून विविध कंपनीच्या तब्बल ६ लाख ७३ ,१२० सिगारेट तस्करी करुन आणण्यात आल्या होत्या. याप्रकरणी गोदाम मालक बिपीन सिंग (वय ३०) याला अटक करण्यात आली असून त्याला २५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या कारवाईतून परदेशातून सिगारेटची तस्करी करण्याचे रॅकेट उघडीस आले असून सिंग याच्या दिल्लीतील काही साथीदारांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे.मणिपुरातून सिगारेटची तस्करी करण्यात आली असल्याची माहिती डीआरएच्या पथकाला मिळाली. कार्गो कुरियर कंपनीद्वारे हा माल दिल्लीतून रेल्वेने मुंबईत आणण्यात आला असल्याची माहिती होती. त्यानुसार सहआयुक्त समीर वानखडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून चिराबाजार येथील गोदामवर छापा टाकला. त्यावेळी ६० बॉक्समध्ये बेन्सन अ‍ॅण्ड हेडिज, गुडग, ग्रॅम, मालर्बो,५५५, पॅरिस आदी कंपनीच्या सिगारेट होत्या. गोदामाचा मालकाला न्यायालयात हजर केले असता त्याला २५ जूनपर्यत न्यायालयीन कोठडी मिळाली. परदेशी सिगारेटीच्या तस्करीमध्ये दिल्लीतील टोळी सक्रीय असून बिपीन सिंग याच्या सहकाऱ्यांचा शोध सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Directorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालयCigaretteसिगारेटArrestअटक