शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नोकरीचे आमिष दाखवून एक कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:49 IST

सोळेकर यांनी पैसे तसेच म्हाडातील घराबाबत विचारणा केली. त्यानंतर, घरासाठी लागणाºया कागदपत्रांची मागणी केली. ही कागदपत्रेही त्यांनी दिली. मात्र, तरीही त्यांना घर आणि पैसे परत केले नाही.

ठाणे : मुंबईत रिझर्व्ह बँकेत लिपिकपदाच्या नोकरीचे आमिष दाखवून, तसेच म्हाडाच्या गृहसंकुलामध्ये अल्पदरात घर मिळवून देण्याच्या नावाखाली १६ जणांना एक कोटींचा गंडा घालणाºया प्रशांत बडेकर ऊर्फ अरविंद सोनटक्के (४२, रा. टावरीपाडा, कल्याण, जि. ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील बेबीताई सोळेकर यांना प्रशांतने म्हाडामध्ये ओळख असल्याचे सांगून अल्पदरात घर मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून त्यांच्याकडून साडेतीन लाखांची रक्कम २०१९ मध्ये घेतली होती. प्रशांत हा सातारा जिल्ह्यातील कवठे या त्याच्या मूळगावी यायचा. त्यावेळी त्याला सोळेकर यांनी पैसे तसेच म्हाडातील घराबाबत विचारणा केली. त्यानंतर, घरासाठी लागणाºया कागदपत्रांची मागणी केली. ही कागदपत्रेही त्यांनी दिली. मात्र, तरीही त्यांना घर आणि पैसे परत केले नाही.

अशाच प्रकारे त्याने संदीप साळेकर, पांडुरंग कंक, जगन पवार, मोहन गोळे, गणेश बेलोशे, मारुती शेळके, स्वप्नील रांजणे आदी १६ जणांची ८९ लाख दोन हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सातारा जिल्ह्यातील शिरवळ तसेच नागपूर येथील राणा प्रताप पोलीस ठाणे, अंबड (नाशिक), समतानगर (मुंबई), समर्थ पोलीस ठाणे (पुणे), मावळ (पुणे), नंदुरबार शहर (नंदुरबार), चतु:शृंगी (पुणे) आणि कॅन्टोनमेंट (औरंगाबाद) आदी नऊ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, प्रशांत खडकपाडा येथे येणार असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, संजय शिंदे आणि विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाळे, अंकुश भोसले, नितीन ओवळेकर आणि हेमंत महाले यांच्या पथकाने त्याला १७ जानेवारी रोजी अटक केली.

अशी केली फसवणूकप्रशांत फसवणुकीसाठी वेगवेगळ्या पुस्तकांमधून लोकांचे नंबर मिळवायचा. त्यांना रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून, तसेच मुंबईतील म्हाडा गृहसंकुलामध्ये अल्पदरामध्ये घर घेऊन देतो, असे सांगून फसवणूक करीत असे.

टॅग्स :Policeपोलिस