शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Bribe Case Calculator | एक कोटीच्या लाचेचा व्यवहार ठरला कॅलक्युलेटरवर; वाचा काय झाला संवाद

By मनोज गडनीस | Updated: February 24, 2023 08:19 IST

एका व्यापाऱ्याला त्याच्या एका प्रकरणाची छाननी न करण्यासाठी आणि त्या प्रकरणात त्रास न देण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागण्यात आली.

मुंबई: लाच मागायचे, स्वीकारण्याचेही एकेक प्रकार असतात. कोणी थेट मागणी करतात, तर कोणी आडूनआडून सुचवतात. मात्र, वस्तू व सेवा कर विभागात (जीएसटी) उच्चपदावर असलेल्या अधिकाऱ्याने थेट कॅलक्युलेटरवर लाचेचा व्यवहार ठरविण्याचा नवा ‘परिपाठ’ सादर केला आहे.

एका व्यापाऱ्याला त्याच्या एका प्रकरणाची छाननी न करण्यासाठी आणि त्या प्रकरणात त्रास न देण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागण्यात आली. तक्रारदार व्यापारी आणि जीएसटी अधिकारी यांच्यात झालेला संवाद पुढीलप्रमाणे...

राहुलकुमार (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, जीएसटी) : झाले का बोलणे ?तक्रारदार व्यापारी : बोलणे झाले आहे. मेसेजही पाठवला आहे.राहुलकुमार : बसा. बसून बोलू.तक्रारदार व्यापारी : मी सांगितले तर आहे दोन कोटी रुपयांबद्दल.राहुलकुमार (एक मोठा पॉझ) : अशा गोष्टी कधी बोलायच्या नसतात.

असे सांगत राहुलकुमार याने या प्रकरणी तक्रारदार व्यापाऱ्यासमोर कॅलक्युलेटर ठेवला आणि दोन कोटींचा आकडा कॅलक्युलेटरच झालेल्या घासाघिशीनंतर एक कोटीवर आला. लाचेची ही रक्कम २५ लाख रुपयांच्या चार टप्प्यांत द्यायची ठरली. या लाचव्यवहारात राहुलकुमारचा भागीदार होता त्याचा बॉस आणि पुण्यात जीएसटी विभागात कार्यरत असलेला उपसंचालक विमलेशकुमार सिंह (आयआरएस अधिकारी - २०१४ बॅच).

सीबीआयची शक्कल एक कोटी लाचेची रक्कम ऐकून डोळे पांढरे झालेल्या व्यापाऱ्याने सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली. पुरावा गोळा करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या हाताला दंडाच्या मागील बाजूस छोटा डिजिटल रेकॉर्डर बसवला. पुन्हा त्या अधिकाऱ्यांकडे व्यापाऱ्याला पाठविले. त्यामुळे सीबीआयला पुरावा मिळाला.

बोटीम ॲप राहुलकुमारने तक्रारदाराला सांगितले की, सर्वप्रथम तू दुसरा मोबाइल आणि नवीन सिम कार्ड घे. त्यावर बोटीम नावाचे ॲप डाऊनलोड कर आणि मग या अधिकाऱ्याने स्वतःचा दुसरा क्रमांक त्याला दिला. यावरून आपले पुढील बोलणे होईल, अशी सूचना दिली.

चार ठिकाणी धाडी पडताळणी केल्यानंतर गुरुवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी विमलेशकुमार सिंह यांच्याशी संबंधित तीन ठिकाणी मुंबईत, तर पुण्यात एके ठिकाणी छापे टाकले. या अधिकाऱ्याच्या मुंबईतील घरातून चार लाखांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

टॅग्स :GSTजीएसटीBribe Caseलाच प्रकरण