ठाणे - मुंब्र्यात 2 लाख 52 हजारांचा चरस मुंब्रापोलिसांनी पकडला. मोनुकुमार सिंग (21) याला कौसा येथून आज पहाटे अटक केली. त्याने हा चरस उत्तर प्रदेशातून आणला होता. मुंब्र्यात चरस विक्रीसाठी एक जण येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे.
मुंब्र्यात अडीच लाखांच्या चरससह एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 14:20 IST