शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकास लुटणाऱ्या टोळीतील एकास अटक; २० तोळे दागिने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 21:08 IST

एका आरोपीस अटक करण्यात पोलीसांना यश आले असून त्याच्याकडील २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देगणपतीनिमित्त काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील सिल्वर पार्कमध्ये राहणारे हरिश्चंद्र कुबेर हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरीक घरी गणपती असल्याने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले ४० तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन घरी चालले होते. या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या आरोपींचा तपास स्थानिक गुन्हे शाखेस करण्यास सांगितला होता. आंध प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील महेश मोशा पेटला (वय २९) याला अटक करण्यात आली. त्याने चॅन्टी उर्फ शिरीषकुमार पेटला, मल्ली पेटला व बाबु आवला यांच्यासोबत मिळुन कुबेर यांना लुटल्याचे कबुल केले.

मीरारोड - बँकेत पाळत ठेऊन एका ज्येष्ठ नागरिकाजवळील ४० तोळे सोन्याचे दागिने लुटून पळालेल्या टोळीतील एका आरोपीस अटक करण्यात पोलीसांना यश आले असून त्याच्याकडील २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.गणपतीनिमित्त काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील सिल्वर पार्कमध्ये राहणारे हरिश्चंद्र कुबेर हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरीक घरी गणपती असल्याने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले ४० तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन घरी चालले होते. रस्त्यावरुन ते जात असताना मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कुबेर यांच्या हातातील दागिन्यांची पिशवी बळजबरी खेचुन लुटून नेली. या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या आरोपींचा तपास स्थानिक गुन्हे शाखेस करण्यास सांगितला होता. गुन्हे शाखेचे निरीक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख व काशिमीरा युनिटने घटने नंतरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचे छायाचित्र मिळवले. त्याआधारे तपास करत असताना आंध प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील महेश मोशा पेटला (वय २९) याला अटक करण्यात आली. त्याने चॅन्टी उर्फ शिरीषकुमार पेटला, मल्ली पेटला व बाबु आवला यांच्यासोबत मिळुन कुबेर यांना लुटल्याचे कबुल केले. महेशकडून २० तोळे दागिने सापडले असून अन्य दागिने व टोळीतील उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरु आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकRobberyदरोडा