शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे बोगस भरती प्रकरणात एकाला अटक; सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींना फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 05:57 IST

२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली लष्करातून सेवानिवृत्त झाला असल्याचे समजते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मंत्रालयापाठोपाठ रेल्वेत १४ लाखांत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत मुंबईसह सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींना फसवणूक केल्याच्या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. शांताराम सकपाळ असे त्याचे नाव असून, तो लष्करातून सेवानिवृत्त झाला असल्याचे समजते. न्यायालयाने त्याला २ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हरिश्चंद्र कदम यांनी यासंदर्भात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिस तपास सुरू होता. रविवारी या प्रकरणात सकपाळ याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. सकपाळच्या चौकशीतून या टोळीच्या मुळापर्यंत जाण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सकपाळसह चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. 

 रेल्वेतून मेल आल्याचे भासवून रेल्वेची बनावट नोकरीवर हजर होण्याची ऑर्डर देऊन, त्यावर बनावट सही करून, बनावट शिक्क्यांच्या वापर करून, ती ऑर्डर खरी असल्याचे भासवून उमेदवारांना देण्यात आल्या. त्यानुसार, सुरुवातीला भुसावळ ट्रेनिंग सेंटर गाठले. 

 मात्र, तेथे गेल्यानंतर ऑर्डर कॉपी बनावट असल्याचे समजताच तरुणांना धक्का बसला. त्यानंतर १३ जणांना चेन्नईला पाठविण्यात आले. तेथे गेल्यानंतर एका रेल्वेचे ट्रेनिंग सेंटर सांगून एका खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये एक महिना ट्रेनिंग पूर्ण करण्यास भाग पाडल्याचे तरुणांचे म्हणणे आहे.

टॅग्स :railway recruitmentरेल्वेभरतीfraudधोकेबाजी