शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiya Attacker Arrested: किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी एकाला अटक; शिवसेनेचे कार्यकर्ते मंगळवारी होणार पोलीस ठाण्यात हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 21:59 IST

Kirit Somaiya attack case in Pune: किरीट सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकविण्याचा प्रकार सनी गवते याने केला होता. सीसीटीव्हीमध्ये तो दिसून येतो. त्यावरून त्याला अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकाला क्वॉटरगेट येथून पकडले. सनी गवते (वय ३९, रा. नाना पेठ) असे त्याचे नाव आहे.

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, किरीट सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकविण्याचा प्रकार सनी गवते याने केला होता. सीसीटीव्हीमध्ये तो दिसून येतो. त्यावरून त्याला अटक केली आहे. शहर प्रमुख संजय मोरे व इतरांचा शोध घेण्यात येत आहे.किरीट सोमय्या हे शनिवारी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. यावेळी धक्काबुक्की झाल्याने सोमय्या पायऱ्यांवर पडल्याने जखमी झाले होते.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे आणि युवा सेना सहसचिव किरण साळी यांनी व्हॉटस्ॲपवर मेसेज पाठविला असून न्यायव्यवस्था व महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान ठेवून आम्ही सर्व शिवसैनिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उद्या सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहोत.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv Senaशिवसेना