शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिला चित्रकार विनयभंग प्रकरणात एकाला अटक; वांद्रे पोलिसांची जयपूरमध्ये कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 07:36 IST

मालाडच्या आयटी कंपनीमध्ये जैन काम करत असून त्याचे कुटुंब हे जयपूरमध्ये राहते.

मुंबई : वांद्रे पश्चिमच्या पाली हिल येथील १४५ वांद्रे कॅफे आणि बारमध्ये शनिवारी बंगळुरूच्या ३० वर्षीय महिला डिजिटल चित्रकाराचा विनयभंग करण्यात आला होता. याप्रकरणी तपास करणाऱ्या वांद्रे पोलिसांनी सांताक्रुझ पोलिस पथकाच्या मदतीने अवघ्या ४८ तासात श्रेय जैन (२३) याला जयपूरमधून अटक केली.

जैन विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वांद्रेतील १४५ कॅफे अँड बार येथील तांत्रिक तपासावरून आरोपीची ओळख पटली आणि तो राजस्थानच्या जयपूरचा राहणारा असल्याचे तपास अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार सांताक्रुझ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार सावंत व पथक यांनी खबऱ्याच्या आधारे जैनला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत वांद्रे पोलिस ठाण्यात आणले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली.

वांद्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे, निरीक्षक प्रदीप केरकर (गुन्हे), सहायक पोलिस निरीक्षक बजरंग जगताप, विजय आचरेकर आणि सांताक्रुझ पथकाने गुन्हा दाखल झाल्याच्या ४८ तासात आरोपीचा गाशा गुंडाळला. पीडित महिला मित्राच्या साखरपुड्यासाठी कुटुंबासोबत मुंबईला आली होती. त्यानंतर शनिवारी ते सर्व १४५ कॅफे अँड बारमध्ये जाऊन नाचत असताना अनोळखी मुलगा पीडितेच्या अंगचटीला जाऊ लागला. तसेच गर्दीचा फायदा घेत त्याने तिच्या अंगालाही स्पर्श केला. तेव्हा तिने त्याचा हात पकडत त्याला चापट मारत दूर लोटले. सोशल मीडियावर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तिने मुंबई पोलिसांना टॅग केले होते.

...म्हणे शुद्धीवर नव्हतोमालाडच्या आयटी कंपनीमध्ये जैन काम करत असून त्याचे कुटुंब हे जयपूरमध्ये राहते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मी त्या दिवशी भरपूर मद्य प्राशन केल्याने शुद्धीवर नव्हतो आणि त्यादरम्यान माझ्याकडून हा गुन्हा घडला  असे त्याने सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळMumbaiमुंबईPoliceपोलिस