शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याने ग्रहदोष काढतो सांगून महिलेवर अत्याचार करत धमकी देणाऱ्या भोंदू बाबाला अटक 

By धीरज परब | Updated: May 9, 2024 18:22 IST

मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी अटक केली आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - समाजमाध्यमांवर हस्तरेखा तज्ञ अशी जाहिरात करून प्रत्यक्षात जादूटोण्याने ग्रहदोष काढतो सांगून एका महिलेवर बळजबरी करत तिचे आक्षेपार्ह्य फोटो - व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या भोंदू बाबास मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्या मोबाईल मध्ये अन्य महिलांची छायाचित्रे देखील आढळून आली असून २०१९ साली सुद्धा नया नगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे . 

फेसबुक वर हस्तरेखा तज्ञ अशी जाहिरात पाहून एका महिलेने कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्यासाठी मीरारोडच्या शांती नगर सेक्टर १० मधील विनोद पंडित ऊर्फ संतोष जगन्नाथ पोद्दार ( वय ५५ वर्षे  ) याच्याशी संपर्क साधला होता . आपल्याला जादूटोणा , काळी विद्या अवगत असून त्याचा वापर करून पत्रिकेतील राहुदोष दूर करतो . कौटुंबिक वाद दूर करून देतो असे पोद्दार याने महिलेस सांगितले . त्या बहाण्याने त्याने तिच्यावर जबरदस्तीने  नैसर्गिक आणि अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केले . 

शरीर संबंधा वेळचे महिलेचे आक्षेपार्ह्य फोटो - व्हिडीओ तिच्या नकळत काढून ते तिला व्हॉट्सअप वर पाठवत समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली . तिला तो सतत तसे मॅसेज करत असे . १० डिसेम्बर २०२० ते ११ एप्रिल २०२४ ह्या काळात पोद्दार याने महिलेचे लैंगिक शोषण करून तिला ब्लॅकमेल करत होता . 

अखेर पीडितेने नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर ८ मे रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोद्दार ह्याला अटक केली . त्याच्या मोबाईल मध्ये अन्य महिलांची सुमारे ४० ते ५० छायाचित्रे सापडली असून पोलीस मोबाईल सह त्याचा संगणक वा लॅपटॉप असल्यास त्याची देखील तपासणी करणार आहेत . पोद्दार याच्यावर २०१९ साली देखील नया नगर पोलीस ठाण्यात बलात्कार , आयटी ऍक्ट सह महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा उच्चटन करणे अधिनियम नुसार गुन्हा दाखल आहे . 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अब्दुल हक देसाई हे तपास करत आहेत . सदर ढोंगी बाबाने कोणाची फसवणूक वा अत्याचार केला असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर