शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संशयित बोटीत सापडलेल्या बेकायदेशीर ३५० लीटर डिझेल प्रकरणी एक आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 19:53 IST

करंजा-उरण येथील बंदरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना एक संशयित मच्छीमार बोट आढळून आली होती.

मधुकर ठाकूर

उरण : करंजा बंदरातून सोमवारी ताब्यात घेतलेल्या संशयित बोटी प्रकरणी १२ तासांच्या चौकशीनंतर बेकायदेशीर ३५० लीटर डिझेल बाळगण्याचा ठपका ठेवून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अकबर इस्माईल शेख रा.मनिष मार्केट-मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती सुनील पाटील यांनी दिली.

करंजा-उरण येथील बंदरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना एक संशयित मच्छीमार बोट आढळून आली होती. नाव,नंबर, कागदपत्रे नसलेली ही संशयित मच्छीमार बोट सोमवारी (२६) उरण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतली होती. कस्टम, पोलिस, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकाऱ्यांकडून या गंभीर घटनेची तब्बल १२ तास चौकशी सुरू होती.दरम्यान मालकाच्या एका हस्तकामार्फत बोटीची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.या कागदपत्रांनुसार सहा सिलेंडरची ही  साईसागर बोट सन १९८७ साली नायगाव वसई येथे बांधण्यात आली होती.त्यानंतर ती बोट श्रवण कुमार वासुदेव कनोजिया रा.शिवाजी नगर- गोवंडी यांना २०१७ मध्ये विकण्यात आली होती. या बोटींची येथील ससुनडॉक बंदरात नोंदणी करण्यात आली आहे.त्यानंतर ही बोट मोहन जभाजी वराळे रा.ससुनडॉक-मुंबई यांना भाड्याने देण्यात आली आहे. 

नादुरुस्त झाल्याने ही बोट करंजा येथील बंदरात आणण्यात आली होती. या बोटीचा वापर तस्करीच्या मार्गाने डिझेल विक्रीसाठी करण्यात येत असावा या संशयातून सोमवारी बोट चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली होती. कागदपत्राची तपासणी आणि इतर चौकशीनंतर या बोटीचे निर्दोषत्व सिध्द झाले आहे.मात्र  बोटीत बेकायदेशीरपणे ३५० लिटर डिझेल आढळून आल्याप्रकरणी उरण तहसील पुरवठा अधिकारी सोमलिंगा बिराजदार यांच्या तक्रारीनंतर अकबर इस्माईल शेख रा.मनिष मार्केट-मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आली आहे. पुढील  तपास सुरू असल्याची माहिती वपोनि सुनील पाटील यांनी दिली.तर बोटीच्या मालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या सत्यतेची पडताळणी केली जात असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना  अधिकारी सुरेश बागुलगावे यांनी दिली. 

टॅग्स :uran-acउरणCrime Newsगुन्हेगारी