शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पुन्हा हादरली! राष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी चिमुरडीवर अत्याचार, केली हत्या

By नितीन पंडित | Updated: January 25, 2023 17:39 IST

भिवंडी - शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागाव परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण व अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ...

भिवंडी - शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागाव परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण व अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना मंगळवारी राष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी घडली आहे. विशेष म्हणजे रविवारी काटई गावातील चिमुरडीचा अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या तीन दिवसात भिवंडी पुन्हा एकदा या घटनेने हादरली असून या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील नागाव भागातील एका चाळीत दुर्दैवी मुलगी आपल्या आई वडील व दोन भावंडांसह राहत होती.वडील भंगार फेरीवाला व्यवसाय करणारा असून आई मजुरीचे काम करते.दोन महिन्या पुर्वी मुलीचे आई वडील तीन मुलांसह या ठिकाणी राहायला आले होते.घरात तीन वर्षीय मुलीसह पाच व सहा वर्षांच्या दोन मुलांना घरात ठेऊन मंगळवारी आई वडील सकाळी कामावर गेले होते.दुपारी एक वाजता महिला घरी आली.त्यावेळी तीन वर्षीय मुलगी आढळून न आल्याने तिने परिसरात तिचा शोध घेतला मात्र ती न सापडल्याने अखेर सायंकाळी आठ वाजता महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची तक्रार दिली.

पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करून चिमुरडीचा शोध घेतला मात्र मुलगी सापडली नाही,त्यांनतर बुधवारी सकाळी त्याच परिसरातील एका चाळीच्या पहिल्या मजल्यावरील अडगळीच्या खोलीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.शांतीनगर पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी झडती सत्र सुरू केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांची माहिती चाळ मालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असून  माहिती न देणाऱ्या चाळ मालकांवर पोलीस विभागातर्फे कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी