शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात वृद्ध शेतकऱ्याची निर्घृण हत्या; तुरीच्या शेतात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 13:04 IST

सेनगाव तालुक्यातील बरडा येथील घटना

ठळक मुद्देसेनगाव तालुक्यात आठ दिवसातील दुसरी घटना

सेनगाव : तालुक्यातील येथील बरडा येथे तुरीच्या शेताला राखण असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली आहे. वामन लक्ष्मण शेंडगे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी खुनाचा संशय व्यक्त केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बरडा येथील वामन लक्ष्मण शेंडगे यांच्या शेतात तुरीचे पीक जोमदार आले आहे. जनावरे शेतातील पिकांचे नुकसान करत असल्याच्या घटना वाढल्याने शेंडगे शेतात राखण करण्यासाठी जात असत. गुरुवारी रात्री सुद्धा शेंडगे शेतात राखणीला गेले होते, मात्र सकाळी उशिरा पर्यंत ते घरी परतले नाहीत. यामुळे शेंडगे यांचा मुलगा त्यांच्या शोधार्थ शेतात गेला. यावेळी तुरीच्या शेतात शेंडगे यांचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या घटना आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार हा खुनाचा प्रकार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

आठ दिवसात दुसरी घटना सेनगाव तालुक्यात मागील आठ दिवसात खुनाची दुसरी घटना उघडकीस आली आहे. आठ दिवसांपूर्वी तळणी येथील शेत शिवारात एका महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आली होती. विशेष म्हणजे या खुनाचे घटनास्थळ आणि बरडा येथील आज मृतदेह आढळून आलेले घटनास्थळ हे एकाच शेत शिवाराचा भाग आहेत.

टॅग्स :MurderखूनHingoliहिंगोलीPoliceपोलिस