शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानिया यांच्यावरील ‘तो’ गुन्हा औरंगाबाद खंडपीठात रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 18:55 IST

 माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली अनिश दमानिया यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले.

औरंगाबाद :  माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली अनिश दमानिया यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी मंगळवारी (दि.२८ )  दिले. 

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. दमानिया यांच्या म्हणण्याप्रमाणे, भुजबळ यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दमानिया यांना खडसे आणि भुजबळांच्या विरोधातील प्रकरणे मागे घेण्यासाठी दबाव आणला होता. काही दिवसांनी, भुजबळांच्या जनसंपर्क  अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी दमानियांवर आरोप केले. खडसेंना पैशाच्या आरोपात अडकविण्याचा प्रयत्न दमानिया यांनी केल्याचे त्यांनी म्हटले होते. 

यानंतर खडसेंनी दमानिया यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून दमानियांविरुद्ध भादंवि कलम ४५२, १८६, १२० (ब), १४९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. या तक्रारीवरून पोलिसांची चौकशी सुरू झाली होती. यावल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याची विनंती दामानिया यांनी याचिकेत केली होती.  

सुनावणीदरम्यान युक्तिवाद करण्यात आला की, दमानिया यांच्याविरुद्ध ऐकीव माहितीच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही. केवळ सूड घेण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल केला.  याचिकेत एकनाथ खडसेंसह, राज्य शासन आणि पोलीस निरीक्षकांना प्रतिवादी करण्यात आले होते. सुनावणीअंती दमानियांवर यावल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. खडसे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ  विनायक दीक्षित, राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, दमानिया यांच्यातर्फे  अ‍ॅड. सतेज जाधव यांनी काम पाहिले.

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारी