शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधात अडसर; पत्नीने काढला पतीचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 09:17 IST

घटनास्थळावरून दोन व्यक्ती पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडांना सुपारी देऊन  भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील मार्गावरील एका ढाब्यासमोर घडली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नीसह तिचा प्रियकर आणि  सुपारी घेऊन हत्या करणारे दोन मारेकरी गुंड अशा चार जणांना अटक केली आहे.

मृत रमेश झा (वय ४८) हे मूळचे दिल्लीचे असून ते अंबरनाथ एमआयडीसीत एका कंपनीत कामगार होते. ते सर्वोदयनगर परिसरात संशयित आरोपी सुमन आणि दोन मुलांसह राहत होते. २५ फेब्रुवारीला रात्री त्यांची एका ढाब्यासमोर भररस्त्यात दोन अनोळखी मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची तक्रार २६ फेब्रुवारीला रमेश यांच्या मुलाने दिली. 

घटनास्थळावरून दोन व्यक्ती पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसले. दोन्ही मारेकरी रिक्षात बसून जाताना दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी दिल्लीला पळून जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने दिल्ली गाठत आरोपींना दिल्ली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी हत्येची कबुली दिली.

दहा वर्षांपासून दिल्लीत वास्तव्यरमेश यांची बायको दहा वर्षांपासून दिल्लीत राहत असताना तिचे धर्मवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर २०२२ मध्ये सुमन दिल्लीतील प्रियकराला सोडून अंबरनाथमध्ये पतीकडे राहण्यास आली. मात्र, पती  अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने सुमन, धर्मवीर या दोघांनी रमेश यांची हत्या करण्याचा कट रचून दिल्लीतील दोन गुंडांना सुपारी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी