शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री 1 वाजता तरुणीला भेटायला उत्साहात पोहोचला तरुण अन् त्यानंतर जे काही घडले ते होते भयानक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:45 IST

Crime News : पीडित तरुणाच्या भावासोबत व्हिडिओ कॉलवर संभाषण सुरू असतानाही चाकूने वार करण्यात आले आणि जवळपास 76 लाख रुपयांची खंडणी मागितली. 

इंस्टाग्रामवर तरुणीसोबत झालेल्या चॅटनंतर एक तरूण तिला भेटण्यासाठी एका अपार्टमेंटमध्ये पोहोचला. मात्र प्रत्यक्षात हा तरूण हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला. हे प्रकरण अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन शहरातील आहे. अमेरिकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित तरूणाने आरोप केला आहे की, तो ज्या तरुणीसोबत चॅट करत होता. तिने त्याचे अपहरण केले आणि तासनतास त्याच्यावर अत्याचार केले. या तरुणाच्या भावासोबत व्हिडिओ कॉलवर संभाषण सुरू असतानाही चाकूने वार करण्यात आले आणि जवळपास 76 लाख रुपयांची खंडणी मागितली. 

दरम्यान, या घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेतला. त्याला बांधून व्हॅनच्या मागे जखमी अवस्थेत टाकण्यात आले होते. आता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हॅलेरी रोझारियो असे आरोपी तरुणीचे नाव आहे. ती 22 वर्षांची आहे.  या तरुणीवर अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, तरूण मार्बल हिल अव्हेन्यू येथे रात्री उशिरा एक वाजता तरुणीकडे पोहोचला होता. यानंतर तरुणीने त्याच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तसेच, कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार,  त्या अपार्टमेंटमध्ये तीन जणांनी आधीच प्रवेश केला होता. त्यापैकी एकाकडे पिस्तूल होते. व्हॅलेरी आणि तिच्या साथीदारांनी पीडित तरुणाचे कपडे काढले. त्याला बाथटबमध्ये नेले आणि त्याच्यावर काही ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला आग लावली. त्यानंतर त्याच्या पायावर आणि पाठीवर चाकूने वार केले.

पीडित तरुणाला व्हॅलेरी हिने आपल्या जाळ्यात ओढण्यामागील कारण म्हणजे इंस्टाग्रामवर तरुण आपल्या श्रीमंतीचा पुरावा देत होता. पैशाच्या लालसेपोटी व्हॅलेरी हिने पीडित तरुणासोबत अशाप्रकारे कट रचला.  मॅनहॅटन क्रिमिनल कोर्टातील सहाय्यक जिल्हा वकील अँड्र्यू क्लुगर यांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि त्या व्यक्तीचा तासनतास छळ केला.

दाखल तक्रारीनुसार, दुपारी पीडित तरुणाच्या भावाला व्हिडिओ कॉल आला. मास्क घातलेल्या अपहरणकर्त्यांनी खंडणीची मागणी केली आणि त्यापैकी एकाने त्याच्या भावावर चाकूने हल्ला केला. त्यावेळी एकजण म्हणाला- 'आम्हाला एक लाख डॉलर दिले नाही, तर तुझ्या भावाला मारून टाकू'. नंतर यातील एक आरोपी जेवियर वर्गास याला पोलिसांनी अटक केली आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी