शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
2
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
3
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, एकाला अटक!
4
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
5
आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
6
मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
7
भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
8
‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  
9
नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
10
व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?
11
छाप्यानंतर सुरू व्हायचा 'खेळ', CGST डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारीच्या घरीच व्हायची 'ती' डील
12
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
13
मणिपूर हादरले! पहाटेच्या वेळी तीन शक्तिशाली IED स्फोट, सुरक्षा यंत्रणांनाही धक्का, दोन जखमी
14
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
15
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
16
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
17
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
18
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
19
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
20
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात साहिलची पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:45 IST

पिस्तुलाच्या धाकावर एका तरुणाच्या जबरदस्तीने सह्या घेऊन कोट्यवधीची मालमत्ता हडपल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलीस ठाण्यात कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देअपहरण करून सह्या घेतल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिस्तुलाच्या धाकावर एका तरुणाच्या जबरदस्तीने सह्या घेऊन कोट्यवधीची मालमत्ता हडपल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलीस ठाण्यात कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शशांक नथुजी चौधरी (वय ३१) असे या प्रकरणातील पीडित व्यक्तीचे नाव असून ते वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर जवळच्या शेगाव येथील रहिवासी आहेत. चौधरी यांच्या तक्रारीनुसार सुरेंद्र नगरातील सेंट्रल रेल्वे एम्प्लाईज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमध्ये ही मालमत्ता आहे. या मालमत्तेची मालकी प्रशांत चौधरी यांच्याकडे होती. ती हडपण्यासाठी आरोपी साहिल सय्यद, गिरीश गिरधर, संदीप बनसोड आणि त्याच्या तीन साथीदारांनी बनावट कागदपत्रे बनविली. मूळ मालकाचे मृत्युपत्र बनवून त्यावर बनावट सही केली. त्यानंतर चौधरी यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. डोक्यावर पिस्तुल लावून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या समझोता पत्रावर सही आणि अंगठा घेतला. नंतर संदीप बनसोड यांच्या नावावर ही मालमत्ता करण्यात आली. या प्रकरणी चौधरी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा आवाज दाबण्यात आला. दरम्यान, साहिलच्या पापाचा घडा फुटल्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला. त्यामुळे चौधरी यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला.चौथा गुन्हासाहिल विरुद्ध दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हेगारी षड्यंत्र रचून नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये फसविण्याचा कट रचणे, स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडपण्याच्या आरोपांवरून तहसील मानकापूर तसेच पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी