शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

पळण्याचा डाव फसला, दाऊद गँगशी लागे-बांधे असलेल्या कुख्यात आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 15:28 IST

बांगलादेश येथून पासपोर्ट बनवून नैरोबी येथे जाण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाल्याने तो मुंबईत परतला होता. 

ठळक मुद्देकुख्यात आरोपी अख्तर कासमअली मर्चंट (५६) याला पालघरच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या सेलने सापळा रचून नालासोपाऱ्यातून मंगळवारी अटक केली.भाईंदरमधील नयानगर पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता.

मुंबई - मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, ठाणे ग्रामीण या पोलीस ठाण्यातील अनेक गंभीर गुन्ह्यातील फरार, दाऊद गँगशी संबंधित तसेच मुंबईतील साथीदारांच्या मदतीने स्वत:ची गँग बनवून खंडणी गोळा करणे, अपहरण करणे असे प्रकार करून पैसे गोळा करणारा कुख्यात आरोपी अख्तर कासमअली मर्चंट (५६) याला पालघरच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या सेलने सापळा रचून नालासोपाऱ्यातून मंगळवारी अटक केली.बांगलादेश येथून पासपोर्ट बनवून नैरोबी येथे जाण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाल्याने तो मुंबईत परतला होता. तो नालासोपारा येथील रहिवाशी आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तो फरार होता. मर्चंट दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित असून मुंबईतील दाऊदच्या सहकार्‍यांच्या मदतीने त्यांनी स्वतःची गँग तयार केली होती. ही गँग खंडणी गोळा करणे, त्यासाठी अपहरण करण्याचे काळे धंदे करीत असे. मर्चंट याचे ड्रग्ज माफियांशीही संबंध आहेत. त्याच्याविरोधात गुजरातसह महाराष्ट्रातील ठाणे ग्रामीण, मीरा रोड, नागपाडा, मुंबई परिसरात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

भाईंदरमधील नयानगर पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. फरार मर्चंट बांगलादेश आणि नेपाळमध्ये लपून राहिला होता.  नैरोबी येथे जाण्याचा प्रयत्न फसल्याने मर्चंट मुंबईत नालासोपारा येथील आपल्या घरी येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली होती. त्यावरून पाटील यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम, चंद्रकांत ढाणे, पोलीस हवालदर एस. एच. निकोळे, पी.एस. तुरकर, एम. व्ही. चव्हाण, जे. एन. गोवारी यांच्यासह सापळा रचला होता. सोमवारी रात्री सिव्हीक सेंटर चौकात येथे मर्चंट याला अटक केली. चौकशी करून मर्चंटला नयानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसArrestअटकDawood Ibrahimदाऊद इब्राहिम