शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

चोरांनी नाही तर मालकानेच केला 'तो' खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:47 IST

या प्रकरणी आरोपींनी चोरट्यांनी मारहाण केल्याने चालकाचा खून झाल्याचा बनाव रचला होता.

औरंगाबाद : फ्लॅटमधून पंखा चोरून नेल्याच्या कारणावरून मालक आणि त्याच्या मित्रांनीच हायवाचालकाचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. गुरुवारी रात्री चोरट्यांनी मारहाण केल्याने चालकाचा खून झाल्याचा बनाव आरोपींनी रचला होता. मात्र, गुन्हेशाखेने याचा उलगडा करून आज खऱ्या आरोपींना ताब्यात घेतले.  

या बाबत अधिक माहिती अशी की , मालकाने बोलाविल्यामुळे घराबाहेर पडलेला हायवा चालक नितीन भीमराव घुगेचा गुरुवारी रात्री संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मध्यवर्ती जकात नाका परिसरात चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे मृताचे मित्र आणि मालकाने पोलिसांना सांगितले. मात्र यानंतर नितीनच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हेशाखेने याप्रकरणातील बारकावे तपासण्यास सुरुवात केली. यातून त्यांना काही संशयास्पद बाबींचा उलगडा झाला आणि ते खऱ्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोंचले. तपासात  फ्लॅटमधून पंखा चोरून नेल्याच्या कारणावरून नितीनचा मालक आणि त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचे  निष्पन्न झाले. यावरून पोलिसांनी नितीनचा मालक कंत्राटदार मनोज डवरे पाटील, नील काकासाहेब पाटील, शुभम पाटील आणि दत्ता भांगे यांना ताब्यात घेतले आहे.  

मालकानेच रचला कट मनोज डवरे हा मनपाचा कचरा वाहतूक करणारा ठेकेदार आहे. गुरुवारी रात्री मनोज आणि त्याचा मित्र नील पाटील याने खुनाचा कट रचला. यानुसार नितीनला त्यांनी कामाचे कारण सांगून फ्लॅटवर बोलावून घेतले. यानंतर मनोज, नील , शुभम पाटील आणि दत्ता भांगे यांनी त्याला मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नितीनला त्यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. येथेच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी मनोजने नितीनच्या भाऊ सचिनला फोन करून तुम्ही घाटीत या त्याचा अपघात झाला असल्याचे सांगितले. सचिन घाटीत गेला असता त्याने नितीनचा चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या तपासात हा बनाव असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.