नवी दिल्ली - व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या मॅकफी लॅब्जने एक अत्यंत धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, डेटिंग ॲप्स,सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक भारतात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ६० टक्के भारतीयांना बनावट किंवा ‘इनव्हाइट-ओन्ली’ डेटिंग ॲप्सची निमंत्रणे आली असून, यातील अनेकांना सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य बनवले आहे. ३४ टक्के प्रौढांनी प्रेम, नातेसंबंध किंवा डेटिंगविषयक सल्ल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर केला आहे.
ही आहे फसवणुकीची नवीन पद्धत डेटा स्पष्ट करतो की, डेटिंग स्कॅम्स आता खूप संघटित झाले आहेत. स्कॅमर्स आधी विश्वास निर्माण करतात, काळजी घेण्याचे नाटक करतात. विश्वास बसल्यावर बोगस स्टॉक ट्रेडिंग, क्रिप्टो प्लॅटफॉर्म्स मध्ये गुंतवणूक करण्यास सांगणे किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचे कारण देऊन पैसे मागणे. बार किंवा कॅफेसारख्या ठिकाणी बोलावून तिथे भरमसाठ बिल भरण्यास भाग पाडले जाते.
प्रेमाच्या आड आर्थिक लूटप्रत्येक ७ पैकी १ भारतीयाने ऑनलाइन रोमान्स स्कॅममुळे पैसे गमावले. सरासरी आर्थिक नुकसान : २,८०,६५० रुपये. अनेक प्रकरणांमध्ये ९०,००० पेक्षा अधिक रक्कम गमावल्याचीही उदाहरणे आहेत.
सुरक्षित ऑनलाइन डेटिंगसाठी... अतिशय वेगाने पुढे जाणाऱ्या नात्यांबाबत सावध रहा. व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉल टाळणाऱ्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष भेट न होता पैसे, गिफ्ट कार्ड किंवा क्रिप्टो पाठवू नका. क्यूआर कोड, पेमेंट लिंक किंवा ओटीपी मागणाऱ्या विनंत्यांपासून दूर रहा. सुरुवातीला वैयक्तिक माहिती मर्यादित ठेवा.
Web Summary : Valentine's Day sees surge in dating app scams. Victims lose money through fake investments, emergencies. Losses average ₹2,80,650. Stay cautious, avoid quick relationships and financial requests.
Web Summary : वैलेंटाइन डे पर डेटिंग ऐप स्कैम में तेजी। पीड़ितों को नकली निवेशों, आपात स्थितियों के माध्यम से पैसे का नुकसान। औसतन नुकसान ₹2,80,650। सावधान रहें, जल्दी रिश्ते और वित्तीय अनुरोधों से बचें।