शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बायको म्हणाली, सासू असेल तर येणार नाही; मुलानं जे केले ते ऐकून काळीज धस्स होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 16:40 IST

या भयानक हल्ल्याचं दृश्य पाहून प्रत्येकाचं काळीज फाटलं. बघणाऱ्याच्या डोळ्यातही पाणी आलं.

नोएडा - ज्या आईचं दुध पिऊन मुलगा मोठा झाला तिलाच मारताना निर्दयी मुलाचे हात धजावले नाहीत. ती आई प्रत्येकक्षणी मुलाची काळजी करत होती. बायकोचं आईसोबत भांडणं झाल्यानंतर मुलाने आईलाचा वाटेतून बाजूला सारायचं ठरवलं. ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील आहे. कलियुगी मुलाने स्वत:च्या आईवर लाठीकाठीनं धारदार शस्त्रानं हल्ला केला आहे. मुलाच्या हल्ल्यात आई गंभीररित्या जखमी झाली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. 

या भयानक हल्ल्याचं दृश्य पाहून प्रत्येकाचं काळीज फाटलं. बघणाऱ्याच्या डोळ्यातही पाणी आलं. आसपास राहणारे लोकही संतापले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाहणारा सुन्न झाला. सध्या या वृद्ध आईची तब्येत स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. वृद्ध महिलेचे नातेवाईक आणि पोलीस हॉस्पिटलमध्ये हजर आहेत. पोलीस उपायुक्त हरिश चंदर म्हणाले की, मोहियापूर गावात राहणाऱ्या श्रीमती जगमती यांच्या मुलाने २८ मे रोजी रात्री दारूच्या नशेत आईवर लाठीकाठी, शस्त्राने हल्ला केला. 

तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले त्यांनी आरोपी मुलाला अटक केली. तपासावेळी पोलिसांना कळालं की, आरोपी मनोजची पत्नी आणि त्याच्या आईमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर पत्नी रागात माहेरी निघून गेली. मनोजच्या पत्नीने पतीसमोर अट ठेवली की जोपर्यंत सासू घरातून जात नाही तोवर ती सासरी येणार नाही. पत्नीच्या या अटीमुळे आरोपी मनोजनं आईचा काटा काढण्याचं ठरवलं. 

आरोपी मनोज रागाच्या भरात घरी पोहचला त्याने दारूच्या नशेत आईवर जीवघेणा हल्ला केला. परंतु ती थोडक्याच बचावली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा आढावा घेतला. सोशल मीडियावर वृद्ध महिलेच्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोकांनी या कलियुगी मुलाविरोधात संताप व्यक्त केला आहे. या मुलाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी नेटिझन्सनं केली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे मात्र या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.