शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ना वैद्यकीय पदवी ना अनुभव... तरीही रुग्णांंवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 08:53 IST

No medical degree or experience : गोवंडी, शिवाजीनगर परिसरात अशा बोगस डॉक्टरांबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी याठिकाणी छापा टाकला.

मुंबई : वैद्यकीय पदवी नसताना केवळ गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून डॉक्टर असल्यासारखे वावरणाऱ्यांची गुन्हे शाखेने धरपकड सुरु केली आहे. यात गोवंडीतून ५ बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने ही कारवाई केली आहे.गोवंडी, शिवाजीनगर परिसरात अशा बोगस डॉक्टरांबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी याठिकाणी छापा टाकला. महानगरपालिकेचे अधिकारी आणि डॉक्टर यांची यावेळी मदत घेण्यात आली.येथील बैगनवाडी परिसरातील आलिशा, आसिफा, मिश्रा, रेहमत, क्षमा या नावाने क्लिनिक चालविणाऱ्या पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मंडळी अधिकृत वैद्यकीय परवाना नसताना तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून बेकायदेशीररित्या रुग्णांवर औषधोपचार करत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या क्लिनिकमधून स्टेथोस्कोप, वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन, ॲन्टिबायोटिक टॅबलेट्स, सर्जिकल ट्रे, सलाईनच्या बाटल्या अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधे व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पाचही डॉक्टरांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशिक्षित ‘टार्गेट’झोपडपट्टी भागातील अशिक्षित आणि गरिबांना टार्गेट करुन सुरुवातीला कमी पैशांत औषधोपचार करायचे. हळूहळू रुग्ण वाढताच पैसे वाढवून रुग्णांच्या जिवाशी ही मंडळी खेळत होती. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याचे आवाहन गुन्हे शाखेने केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर