शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ना वैद्यकीय पदवी ना अनुभव...तरीही रुग्णांंवर उपचार; गोवंडीतून ५ बोगस डॉक्टरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 21:36 IST

5 bogus doctors arrested from Govandi : यात गोवंडीतून ५ बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देमहानगर पालिका अधिकारी आणि डॉक्टर यांची मदत घेण्यात आली. येथील बैगनवाडी परिसरातील आलिशा, आसिफा, मिश्रा, रेहमत,  क्षमा या नावाने क्लिनिक चालविणाऱ्या पाच डॉक्टरावर कारवाई करण्यात आली आहे.  

मुंबई : वैद्यकीय पदवी नसताना केवळ गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून स्वत:ला डॉक्टर समजणाऱ्या मंडळींची गुन्हे शाखेने धरपकड सुरु केली. यात गोवंडीतून ५ बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने ही कारवाई केली आहे.       

गोवंडी, शिवाजी नगर परिसरात अशा बोगस डॉक्टरांबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी याठिकाणी छापा टाकला. महानगर पालिका अधिकारी आणि डॉक्टर यांची मदत घेण्यात आली. येथील बैगनवाडी परिसरातील आलिशा, आसिफा, मिश्रा, रेहमत,  क्षमा या नावाने क्लिनिक चालविणाऱ्या पाच डॉक्टरावर कारवाई करण्यात आली आहे.  ही मंडळी  अधिकृत वैद्यकिय परवाना नसताना तसेच महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल मध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवुन बेकायदेशिररित्या विविध आजारावरील रुग्णांवर औषधोपचार करत होते.        

अटक करण्यात आरोपीच्या क्लिनिक मधून स्टेथोस्कोप, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, अँँन्टीबायोटिक टॅबलेट्स, सर्जिकल ट्रे., सलायन बॉटल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे औषधे व साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. पाचही डॉक्टराविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात  फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीहो गुन्हे शाखेने वेळोवेळी कारवाई करत बोगस डॉक्टरांंची धरपकड़ केली आहे. 

अशिक्षित टार्गेटझोपडपट्टी भागातील अशिक्षित आणि गरीबांना टार्गेट करुन सुरुवातीला कमी पैशांत औषधोपचार करायचा. हळुहळु रुग्ण वाढताच पैसे वाढवून रुग्णांच्या जिवाशी ही मंडळी खेळत असे. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याचा इशारा गुन्हे शाखेने दिला आहे.

टॅग्स :Arrestअटकdoctorडॉक्टरMumbaiमुंबई