शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

केवायसी केलेली नाही, मॅसेजला दिला रिप्लाय अन् सायबर चाेरट्यांनी व्यापाऱ्याच्या बँक खात्यातील दीड लाख उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 11:04 IST

One and half lakh looted from bank account : खात्यातील तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी उघडकीस आला़.

ठळक मुद्देअवघ्या काही मिनिटात तीन वेळा काढले पैसे पाेलिसांनी कलम ६६(सी)(डी) आय.टी. ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका व्यापाऱ्याला तुम्ही केवायसी केली नाही, २४ तासात माेबाइल बंद हाेईल, तातडीने केवायसी करा अशा माेबाइल मॅसेजला उत्तर देऊन अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या सूचनांचे पालन केल्याने त्यांच्या खात्यातील तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी उघडकीस आला़. या प्रकरणी जुने शहर पाेलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्यात आली असून पाेलिसांनी हे प्रकरण सायबर पाेलिसांकडे वर्ग करीत तपास सुरू केला आहे़.

गीता नगरातील रहिवासी अमित उमेश अग्रवाल यांचे तेल्हारा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बचत खाते आहे. त्यांच्या याच खात्याला नेटबँकिंग सुविधा करून ते या माध्यमातून सर्व व्यवहार ऑनलाइन करतात़ अमित अग्रवाल यांच्या मोबाइलवर २९ ऑगस्ट राेजी एक मॅसेज आला. या मेसेजनुसार त्यांनी केवायसी केली नसून दस्तावेज पडताळणी न केल्यास मोबाइल नंबर २४ तासामध्ये ब्लाॅक करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आली. त्यांनी सुरुवातीला या मॅसेजकडे दुर्लक्ष केले, मात्र काही वेळानंतर पुन्हा तोच मॅसेज आला. त्यानंतर अग्रवाल यांनी आलेल्या मॅसेजला रिप्लाय दिला असता समाेरील व्यक्तीने त्यांना फाेन करीत तुमचा माेबाइल नंबर केवायसी केलेला नसल्याचे सांगितले. यावर अग्रवाल यांनी केवायसी करायची पद्धत विचारली असता समोरील व्यक्तीने सर्व प्रक्रिया सांगितली़ त्यानुसार अग्रवाल यांनी प्रक्रिया केली असता त्यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचा मॅसेज आला़ त्यानंतर अकाऊंट बंद करण्यासाठी अग्रवाल यांनी लगेच एसबीआय बँकेत फोन केला. मात्र काही क्षणातच सायबर चाेरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील आणखी ५० हजार व त्यानंतर तीसऱ्यांदा ५० हजार रुपये असा एकून दीड लाख रुपयांचा विड्राॅल केला़ हे तीनही मेसेज अग्रवाल यांना काही क्षणातच धडकले़ त्यामुळे अग्रवाल यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले, मात्र त्यांनी काहीही करायच्या आधीच चाेरट्यांनी त्यांचे बँक खाते साफ केले़ त्यानंतर अमित अग्रवाल यांनी या प्रकरणाची तक्रार पाेलीस ठाण्यात दिली असून पाेलिसांनी कलम ६६(सी)(डी) आय.टी. ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास आता सायबर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी