शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Nitesh Rane Pre Arrest Bail Plea: नितेश राणेंना अटकपूर्व जामिन की अटक? युक्तीवाद उद्यावर गेला, आज काय घडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 19:27 IST

Nitesh Rane Pre Arrest Bail Plea updates: शिवसेनेचा कार्यकर्ता संतोष परब याला मारहाण झाल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यामुळे नॉट रिचेबल झाले असून सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे.

शिवसेनेचा कार्यकर्ता संतोष परब याला मारहाण झाल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यामुळे नॉट रिचेबल झाले असून सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे. य़ावर आज सुमारे तीन-चार तास युक्तीवाद सुरु होता. हा युक्तीवाद पूर्ण झालेला नसल्याने उद्या पुन्हा युक्तीवाद होणार आहे.

नितेश राणेंच्या वकिलांनी ही माहिती दिली. वकिलांनी पोलिसांचा तपास आदी कागदपत्रे न्यायालयात सादर केली. परब यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला, तो आम्ही ऐकला. त्यांनी मांडलेल्या मुद्द्याला उत्तर देत आहोत. तो युक्तीवाद आज पूर्ण झाला नाही, उद्या यावर पुन्हा युक्तीवाद होईल असे सांगितले. तसेच फिर्यादीच्या वकिलांची अंतरिम जामिनाची मागणी न्यायालयाने फेटाळली असल्याचे ते म्हणाले.

गुन्ह्यात आरोपींचा सहभाग आहे का, यावर परब यांच्या वकिलांनी बोलायला हवे होते. परंतू ते न्यायालयात विधानसभेत काय झाले, कोणी कोणाचा सत्कार केला आदी सांगत होते. राजकारणाशी आमचा संबंध नाही, त्यांच्या भेटीगाठी सुरुच असतात. त्यामुळे आम्ही गुन्ह्याशी संबंधीत बोलू, असे त्यांनी सांगितले. उद्या दुपारी पावणे तीन वाजता सुनावणी सुरु होणार आहे. 

संतोष परब यांचे वकील म्हणाले, संगनमताचा विषय हा तपासावेळी समोर आला. त्यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला. अपघाताचा विषय असता तर वेगळी गोष्ट होती. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. परब यांच्यावर पुन्हा जिवघेणा हल्ला होऊ शकतो, त्याच्या कुटुंबावर होऊ शकतो, तरी देखील परब आज न्यायालयात हजर राहिले, त्यांची मानसिकता विचारात घ्यायला हवी, असे विकास पाटील शिरगावकर, सातारा यांनी सांगितले. 

केंद्रातील मंत्र्यांनी आमचे केंद्रात सरकार आहे, ही धमकीची भाषा का मानली जाऊ नये, असा मुद्दा न्यायालयात मांडल्याचे शिरगावकर म्हणाले.  

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Shiv SenaशिवसेनाCourtन्यायालय