शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Gang Rape : दोषींना कधी लटकवणार फासावर यावर कोर्ट देणार आज निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 16:10 IST

कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष

ठळक मुद्दे न्यायाधीशांनी वकील एम. एल. शर्मा यांना फटकारले.निर्भया सामूहिक बलात्कारात या चारही दोषींना फाशी द्या अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. सरकारी वकील - दोषींसाठी कोणतीही याचिका प्रलंबित नाही, म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी.

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील चार आरोपींना फाशी देण्याची तारीख आज जाहीर केली जाऊ शकते. २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या पालकांच्या याचिकेवर दिल्लीचे कोर्टाने आज निकाल देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषी ठरलेल्या ४ जणांना फाशी देण्याची प्रक्रिया त्वरेने करावी व त्यांच्याविरूद्ध मृत्यूदंड वॉरंट काढण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात निर्भयाच्या आई-वडिलांच्या याचिकेवर आज दुपारी निर्णय देण्याची शक्यता आहे.

Nirbhaya Gang Rape Case : आम्ही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहतोय - आशा देवी 

निर्भया सामूहिक बलात्कारात या चारही दोषींना फाशी द्या अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. यासह चौघांविरूद्ध मृत्यूदंड वॉरंट बजावण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पटियाला हाऊस कोर्टात निर्भयाचे आई - वडील आणि पवन, विनय आणि अक्षय या दोषींचे वकील एपी सिंह तसेच चौथा दोषी मुकेशची बाजू मांडण्यासाठी वकील एम. एल. शर्मा हजर झाले आहेत.असा केला न्यायालयात युक्तिवाद सादरप्रतिवादी - क्यूरेटिव याचिका दाखल करण्यासाठी आम्हाला वेळ द्या.न्यायाधीश- जेल प्रशासनाचे काय उत्तर आहे?सरकारी वकील- जेल प्रशासनाचे म्हणणे आहे की, नोटीस कालावधीत कोणतीही याचिका दाखल केली गेली नव्हती आणि कोर्टात कोणतीही याचिका प्रलंबित नाही.वकील शर्मा म्हणाले - मी मुकेशचा वकील आहे. मी संध्याकाळपर्यंत वकालतनामा दाखल करेन.न्यायाधीश - त्याचा वकील आधीपासूनच न्यायालयात आहे.वकील शर्मा- जर संध्याकाळपर्यंत वकालतनामा दाखल केला नाही तर मी या प्रकरणातून बाहेर जाणार आहे.मुकेश यांचे वकील म्हणाले - शर्मा यांनी तुरुंगात मुकेशला भेटलेलं नाही तर मग तो त्यांचा वकील कसा असू शकतो.सरकारी वकील - दोषींसाठी कोणतीही याचिका प्रलंबित नाही, म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी.सरकारी वकील - ही याचिका २०१८ पासून प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत बचाव पक्ष त्यांना बचाव करण्याची संधी मिळाला नाही असे म्हणू शकत नाही. आता हे वकील अचानक जागे झाले आणि म्हणतात की, क्यूरेटिव याचिका दाखल करावी लागेल. त्यांना खटला लांबवायचा आहे. दरम्यान, न्यायाधीशांनी वकील एम. एल. शर्मा यांना फटकारले.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयNew Delhiनवी दिल्लीadvocateवकिल