शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : आम्ही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहतोय - आशा देवी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:36 IST

Nirbhaya Case : निर्भयाच्या आईने प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रिया

ठळक मुद्देआता काही वेळातच देशभरात खळबळ माजवलेल्या निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. आम्ही चार आरोपींच्या फाशीची शिक्षेवर कोर्ट काय आदेश देणार याची वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी दिली आहे.  

नवी दिल्ली - गेल्या महिन्यात देशात बलात्काऱ्यांना दयेची याचिका करण्याची असलेली तरतूद रद्द करण्याचा विचार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोलून दाखवल्यानंतर निर्भयाच्या आई व वडिलांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आता काही वेळातच देशभरात खळबळ माजवलेल्या निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. आम्ही चार आरोपींच्या फाशीची शिक्षेवर कोर्ट काय आदेश देणार याची वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी दिली आहे.   

Nirbhaya Case : निर्भया प्रकरणाच्या सुनावणीतून सरन्यायाधीश झाले बाजूला, पुनर्विचार याचिकेवर उद्या होणार सुनावणी

गेल्या महिन्यात निर्भयाचे वडील बद्रीनाथ सिंह म्हणाले होते की, राष्ट्रपती कोविंद यांनी हे स्पष्ट केले होते की, तुमच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची दया दाखवली जाणार नाही. निर्भया खटल्यातील चारपैकी तीन दोषी तिहार तुरुंगात आणि एक मंडोली तुरुंगात आहे. तिहार तुरूंग प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले, राष्ट्रपतींच्या सूतोवाचानंतर निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी खास दोरखंड आणि फाशी देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. बद्रीनाथ सिंह यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले होते की, राष्ट्रपतींच्या भाषणातून हे स्पष्ट झाले की, माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना ते क्षमा करणार नाहीत. दोषींना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यासाठी तिहार प्रशासनाने २९ ऑक्टोबर रोजी सात दिवसांची मुदत दिली होती. ती सहा डिसेंबरला संपली. चारपैकी एक दोषी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली असल्याचे समजते. त्या लोकांनी एवढा भयानक गुन्हा केला आहे की त्याची शिक्षा फक्त फाशीच आहे. त्या दोषींच्या अंतरात्म्यालाही याची जाणीव झाली आहे, असे ते म्हणाले. निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या होत्या की, ‘राष्ट्रपतींनी न्याय दिला असून सर्वोच्च न्यायालयात देखील न्याय मिळेल.’

अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन सुरू; निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालय