शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : दोषी पवन अल्पवयीन असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 15:22 IST

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

ठळक मुद्देपवन यांनी असा दावा केला आहे की, तो गुन्हा घडला त्यावेळी तो अल्पवयीन होता आणि दिल्ली उच्च न्यायालयाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.याबाबत पवनने याआधी हायकोर्टात धाव घेतली होती, परंतु दिलासा मिळाला नाही आणि याचिका फेटाळून लावण्यात आली.

नवी दिल्ली - निर्भयाचा दोषी पवनच्या अल्पवयीन असल्याच्या दावा करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. २०१२ दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी पवन कुमार गुप्ता यांनी दाखल केलेली याचिका (एसएलपी) फेटाळून लावली. कारण न्यायालयाला या प्रकरणात कोणतेही नवीन आधार मिळाले नाही. पवन यांनी असा दावा केला आहे की, तो गुन्हा घडला त्यावेळी तो अल्पवयीन होता आणि दिल्ली उच्च न्यायालयाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! सर्वोच्च न्यायालयात पवनच्या याचिकेवर २० जानेवारीला सुनावणी

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा टाळण्यासाठी आरोपी पवन गुप्ता याने नवीन युक्ती अवलंबून याचिका दाखल केली होती. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. वास्तविक पवन गुप्ता असा दावा करतो की घटनेच्या वेळी तो अल्पवयीन होता. त्याच्या दाव्याच्या सत्यतेची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आज त्याच्या याचिकेवर सुनावणी पार पडली.दोषी पवनने न्या. आर. भानुमति, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर हायकोर्टाच्या निकालाला आव्हान दिले होते. या घटनेच्या वेळी तिने अल्पवयीन असल्याची विनंती फेटाळून लावली होती. दोषीने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, १६ डिसेंबर २०१२ रोजी तो गुन्हा घडला तेव्हा तो अल्पवयीन होता.याबाबत पवनने याआधी हायकोर्टात धाव घेतली होती, परंतु दिलासा मिळाला नाही आणि याचिका फेटाळून लावण्यात आली. पवन यांनी असा युक्तिवाद केला आहे की वयाची तपासणी करण्यासाठी त्याच्या हाडांची तपासणी अधिकाऱ्यांनी केली नव्हती. त्याने सर्वोच्च न्यायालयात अल्पवयीन असल्याचा खटला चालू ठेवण्याची विनंती केली. तसेच पवनने याचिकेत १ फेब्रुवारी जारी केलेल्या डेथ वॉरंटवर स्थगितीची मागणी केली आहे. पवन आणि अक्षय यांनी अद्याप क्युरेटिव्ह याचिका दाखल केली नसल्याची माहिती मिळत आहे. तर विनय आणि मुकेश यांच्या क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्या होत्या. मुकेशची दया याचिकादेखील फेटाळण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषी आरोपी पवन गुप्ताची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली होती. ही याचिका फेटाळतानाच आरोपीच्या वयाबाबत 'लपाछुपी'चा खेळ खेळण्यात आल्याचा ठपका ठेवत कोर्टाने आरोपीचे वकील ए. एन. सिंह यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच दिल्ली बार कौन्सिलला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानुसार नुकतेच वकील ए. एन. सिंहला दिल्ली बार कौन्सिलने नोटीस बजावली आहे. पवन गुप्ताच्या वयाबाबत खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल दिल्ली बार कौन्सिलने ए. पी. सिंह यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय