शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! सर्वोच्च न्यायालयात पवनच्या याचिकेवर २० जानेवारीला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 20:41 IST

पवनने दाखल केलेल्या स्पेशल लिव्ह पिटिशनवर (विशेष रजा याचिका) २० जानेवारीला सुनावणी घेणार आहे. 

ठळक मुद्देचार दोषींना १ फेब्रुवारीला फाशी होणार की नाही यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याआधी हायकोर्टाने पवन अल्पवयीन असल्याचा त्याचा दावा फेटाळला होता.  

नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली. त्यामुळे मुकेश याला फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मुकेशने केलेल्या दया याचिकेमुळे फाशीची शिक्षा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. निर्भयाच्या चारही दोषींना २२ जानेवारीऐवजी आता १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फासावर चढविले जाणार आहे, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले होते. मात्र हायकोर्टाने नवीन डेथ वॉरंटला दोषी पवन गुप्ताने सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय पवनने दाखल केलेल्या स्पेशल लिव्ह पिटिशनवर (विशेष रजा याचिका) २० जानेवारीला सुनावणी घेणार आहे. 

अनेकदा दोषींना मिळालेल्या कायदेशीर तरतुदींचा अवलंब करत हे चारही दोषी फाशीची शिक्षा लांबणीवर जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अलीकडेच दोषी मुकेशने दया याचिका सादर केली होती. त्यामुळे २२ जानेवारीला दिली जाणारी फाशीची शिक्षा लांबणीवर गेली. पुन्हा दिल्ली कोर्टाने नवीन डेथ वॉरंट काढत नवीन तारीख म्हणजेच १ फेब्रुवारी निश्चित केली असताना आता दोषी पवनने सर्वोच्च न्यायालयात दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान केले आहे. याआधी हायकोर्टाने पवन अल्पवयीन असल्याचा त्याचा दावा फेटाळला होता.  

निर्भयाच्या आईनं दोषींना माफ करावं, ज्येष्ठ वकिलाचा अजब सल्ला

गुरुवारी रात्री केंद्रीय गृह मंत्रालयाने मुकेशची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली होती. मात्र, आज राष्ट्रपतींना ही याचिका फेटाळली. त्यानंतर चौघांच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली आहे होती. निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना पटियाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ही फाशी पुन्हा लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहेत. पवनने दिलेल्या कोर्टाच्या आदेशाला आव्हानामुळे आता या प्रकरणातील विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार या चार दोषींना १ फेब्रुवारीला फाशी होणार की नाही यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय