नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील निर्भया दोषींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी करणारे केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी केलेली याचिका फेटाळून लावत दिल्ली उच्च न्यायालयाने आज सर्व दोषींना एकाच वेळी फाशी देण्यात येईल असे म्हटले आहे. हायकोर्टाने निर्भयाच्या सर्व आरोपींना ७ दिवसात सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करण्याची मुदतही दिली आहे.
Nirbhaya Case : निर्भयाच्या गुन्हेगारांना एकाचवेळी फासावर लकटवणार की वेगवेगळे? आज निर्णय
निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे. दोषींना कायदेशीर पर्यायांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकरणांत सातत्याने फाशीची शिक्षा टाळण्यात यश आले होते. परंतु आता हायकोर्टाने त्यांना ७ दिवसात सर्व कायदेशीर पर्याय वापरण्यास सांगितले आहे.दिल्ली उच्च न्यायालयानेही दोषींना फाशी देण्यास उशीर केल्याबद्दल अधिकाऱ्यांना फटकारले आहे. हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, एका आठवड्यानंतर डेथ वॉरंट लादण्याची प्रक्रिया सुरू होईल.