शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी चौघांची नऊ तास कसून चौकशी; एडलवाईज समूहाचे अध्यक्ष हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 07:34 IST

पुन्हा ११ ऑगस्टला हजर राहण्याची नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणातील गुन्ह्याच्या अनुषंगाने ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस देण्यात आली. त्यानंतर विविध मुद्द्यांवरील माहिती रायगड पोलिसांनी मागविवली होती. त्यानुसार मंगळवारी कंपनीचे व्यवस्थापक संचालक फणीद्रनाथ काकर आणि इतर तीन पदाधिकारी खालापूर पोलिस ठाण्यात हजर झाले. रायगड पोलिसांनी नऊ तास त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून चौकशी केली. 

दरम्यान, माहिती अपूर्ण आणि विस्तृत स्वरूपात हवी असल्याने पोलिसांनी पुन्हा नोटीस बजावली आहे. ११ ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले असल्याचे अपर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी तक्रार केली होती.

एडलवाईज समूहाचे अध्यक्ष हायकोर्टात

नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याने एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेसचे समूह अध्यक्ष व एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.रशेष शहा हे एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष आहेत तर राजकुमार बन्सल हे एडलवाईज रिकन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.  ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी सोमवारी न्या. नितीन सांबरे व न्या. आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. 

चौकशीला स्थगिती द्यावी, तसेच पोलिसांना कोणतीही कठोर कारवाई करण्यास मनाई करावी, अशी अंतरिम मागणी याचिकादारांनी केली आहे तसेच गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकादारांनी केली आहे.   देसाई यांनी २ ऑगस्टला त्यांच्या कर्जत येथील स्टुडिओमध्येच गळफास लावून आत्महत्या केली.  आपल्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या परिस्थितीबाबत देसाई यांनी काही व्हॉईस नोट तयार केल्या. ४ ऑगस्टला देसाई यांच्या पत्नी नयना यांनी खालापूर पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्याप्रकरणी तक्रार नोंदविली.

आरोपींनी देसाई यांच्यावर थकीत कर्जाची, वसुली करण्यासाठी दबाव आणला आणि थकबाकीमुळे त्यांचा कर्जत येथील एनडी फिल्म वर्ल्ड स्टुडिओ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. देसाई यांच्या एनडीएज आर्ट वर्ल्ड प्रा. लि. विरुद्ध काॅर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया सुरू केल्यानंतर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाचे  तोडगा काढण्याच्या कामासाठी  कोठारी यांची नियुक्ती केल्याचे नयना यांनी  म्हटले आहे. 

टॅग्स :Nitin Chandrakant Desaiनितीन चंद्रकांत देसाई