शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

निकिता हत्या प्रकरण : लव्ह जिहादच्या अँगलने देखील होणार पोलीस तपास 

By पूनम अपराज | Updated: October 28, 2020 19:55 IST

Nikita Murder Case : गृहमंत्री अनिल विज यांनी दिले आदेश

ठळक मुद्देनिकिताच्या आईने सरकारकडे अशी मागणी केली आहे की, पोलिसांनी मुलीची हत्या केली त्याच प्रकारे पोलिसांनी आरोपींचे एन्काउंटर केले जावे.

अंबाला - बल्लभगढ, फरीदाबाद येथे ठार झालेल्या विद्यार्थिनीच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येवरून राज्याचे गृहमंत्री अनिल विज खूप संतप्त आहेत. या प्रकरणात विज यांनी मंगळवारी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी एसआयटीलाही लव्ह जिहादच्या अँगलने या हत्येची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता 2018 मध्ये निकिताच्या अपहरण प्रकरणाचीही चौकशी केली जाईल. अनिल विज म्हणाले की, आरोपींचे नातेवाईक हे काँग्रेसशी संबंधित आहेत आणि त्यांना भीती आहे की, 2018 मध्ये काँग्रेसनी दबाव आणून अपहरणाची तक्रार मागे घेतली. विज यांनी सांगितले की, आपण राज्यातील मुलींना असं मारू देणार नाही.निकिताच्या आईने सरकारकडे अशी मागणी केली आहे की, पोलिसांनी मुलीची हत्या केली त्याच प्रकारे पोलिसांनी आरोपींचे एन्काउंटर केले जावे. त्याचबरोबर त्या म्हणतात की, जर कोणी २० वर्षे मुलीला पालनपोषण करून वाढवून तिचा जीव घेईल तर कोण कशाला मुलीला वाढवेल असे वाटते. मुलगी झाल्यावर लोक मारतील. मृतकची आई वारंवार आरोपींना एन्काउंटर करून मारण्याची मागणी करीत आहे, अशी माहिती न्यूज १८ हिंदीने दिली आहे. हे प्रकरण आहेफरीदाबाद शहरातील एका कॉलेज युवतीची कॉलेजच्या गेटबाहेरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी मुख्य आरोपी तौशीफसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. मृत विद्यार्थींनी बी-कॉम च्या तिसऱ्या वर्गात शिकत होती, सोमवारी सायंकाळी 4 वाजता पेपर देऊन कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर तिच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. बल्लभगढ येथील अग्रवाल कॉलेजबाहेर ही घटना घडली.

 

थरार सीसीटीव्हीत कैद! अपहरणाचा डाव फसल्याने तरुणीची कॉलेजबाहेर गोळ्या घालून हत्या

तौशीफने यापूर्वीही केले होते अपहरणउत्तर प्रदेशच्या हापूल येथील मूळ रहिवाशी असलेल्या निकिता तोमरचे कुटुंबीय फरीदाबाद येथे शिफ्ट झाले होते. याप्रकरणी मुलीचे वडिल मूलचंद तोमर यांनी सांगितले की, तौशीफ नावाचा मुस्लीम कुटुंबातील मुलगा 12 वी पर्यंत निकीतासोबतच शिक्षण घेत होता. यावेळी, निकीतासोबत मैत्री करण्याचा प्रयत्नही त्याने अनेकदा केला असून तिचे धर्मांतर करण्याचा त्याचा डाव होता. मैत्री आणि जबरदस्ती विवाहासाठी नकार दिल्यानंतर तौशीफने सन 2018 साली निकाताचे अपहरण केले. मात्र, बदनामीच्या कारणास्तव त्यावेळी कुटुंबीयांना ते प्रकरण आपापसात मिटवले होते. निकीता ही हुशार विद्यार्थीनी होती. शाळेत 95 टक्के गुण मिळवल्यानंतर, एअर फोर्समध्ये करिअर करण्याची तिची इच्छा होती. मात्र, तौशीफने एकतर्फी प्रेमातून तिची हत्या केली. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसHaryanaहरयाणाArrestअटक