शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष स्वागत आणि नाताळ पार्टीसाठी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या नायजेरियनची ठाण्यात धरपकड

By जितेंद्र कालेकर | Updated: December 20, 2023 18:02 IST

ठाणे पोलिसांकडून यंदाही नववर्षस्वागत व नाताळ सुट्टयामधिल पाटयार्चे अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविली जात आहे.

ठाणे: एकीकडे राज्यात सध्या ललीत पाटीलच्या ड्रग्ज तस्करीचे प्रकरण गाजत असतांनाच ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नववर्ष आणि नाताळ पार्टीच्या निमित्ताने अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ओकोरी इमॅन्युअल ब्राईट (३३, नालासोपारा, पालघर) याला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. त्याच्याकडून १२ लाख ४० हजारांचे ३१ ग्रॅम कोकेनही हस्तगत केले. ठाण्यातील कोपरी पूर्व भागातील आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोड भागात बस पार्किगंजवळ नायजेरीयन व्यक्ती अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती.

त्याचआधारे अपर आयुक्त डॉ. पंजाब उगले, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास घोडके यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, हवालदार रोहीदास रावते आणि सुनिल निकम आदींच्या पथकाने १९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आनंदनगर चेकनाक्याजवळ सापळा रचून नायजेरीयन तस्कर ओकोरी ब्राईट याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३१ ग्रॅम वजनाचे कोकेन, मोबाईल, नायजेरीया देशाचा पासपोर्ट आणि विजा आदी १२ लाख ५१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तो मुळचा नायजेरीयाचा रहिवासी असून त्याने त्याच्या साथीदाराकडून हा अंमली पदार्थ ठाण्यात विक्रीसाठी घेउन आल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. त्याला २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. २०२२ मध्येही अशीच कारवाई -२०२२ मध्येही नववर्षस्वागत तसेच नाताळनिमित्त पार्ट्यांच्या अनुषंगाने अमंली पदार्थ विरोधी मोहीम राबवून वागळे इस्टेट, युनिट पाचच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थाच्या तस्करीतील तीन नाजेरियनला अटक केली होती. त्यांच्याकडून २७ लाख ६७ हजारांचा ६० ग्रॅम कोकेन आणि ७० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले होते. यंदाही करडी नजर -ठाणे पोलिसांकडून यंदाही नववर्षस्वागत व नाताळ सुट्टयामधिल पाटयार्चे अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविली जात आहे. अशा पार्ट्यांमध्ये अंमली पर्दाांची विक्री केली जाते का? याची चाचपणी केली जाणार आहे. अशा पाटयार्ंमध्ये अंमली पदार्थ विक्री हाेत असल्यास त्याची माहिती त्वरीत पोलीसांना देण्याचे आवाहनही गुन्हे शाखेने केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी