शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांना पैसा पुरविणाऱ्यांवर एनआयएचे छापे; हवालाचे चीन कनेक्शन उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 09:08 IST

इमिटेशन ज्वेलरीच्या आयात-निर्यातीतील पैसा अतिरेक्यांना

आशिष सिंहमुंबई - एनआयएने खलिस्तान आणि लॉरेन्स बिश्नोई सिंडिकेटप्रकरणी कारवाई करताना ७६ ठिकाणी छापे टाकले असून, यात मुंबईतल्या आग्रीपाडा भागातील एका घराचा समावेश आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय संशयिताला समन्स देत त्याची गेल्या तीन दिवसांपासून एनआयए टीममकडून चौकशी केली जात आहे. हा संशयित इमिटेशन ज्वेलरीचा व्यापारी आहे आणि तो चीनमधून या ज्वेलरीची आयात व निर्यात करतो. हा पैसा हवालामार्गे अतिरेक्यांना पुरवला जात असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. 

एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई गॅंग आणि गोल्डी बराड यांच्या हवाला लिंक संदर्भात दोन संशयितांना रडारवर ठेवण्यात आले होते. यामुळे चंदीगड एनआयएचे पथक मुंबईत पोहोचले. मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेसह आग्रीपाडा भागातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटवर छापा टाकला. तिथे चौकशीदरम्यान या पथकाला कळले, की त्यांच्या रडारवर असलेल्या मुख्य संशयिताचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे. तो इमिटेशन ज्वेलरी व्यवसायाशी संबंधित होता. हे दागिने तो चीनमधून आयात आणि निर्यात करत असे. ही व्यक्ती अनेक गुन्हेगारी कारवायांशी जोडली गेली असल्याने त्यावर पाळत ठेवण्यात आली होती. 

एनआयए टीमने त्याच्या मुलाची सहा तास चौकशी केली. त्याचे दोन मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. बुधवारी त्याला चौकशीसाठी बोलावले. या चौकशीत इमिटेशन दागिने, आयात-निर्यातीबाबत चौकशी करण्यात आली. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रडारवर असलेले पिता-पुत्र हे इमिटेशन ज्वेलरीशी जोडलेले असून, गोळा केलेली रक्कम बिश्नोई गॅंग आणि गोल्डी बराड यांच्याशी जोडल्या गेलेल्या लोकांना मलेशिया, कॅनडा आणि फिलिपिन्समधून कमिशनच्या आधारावर हवालाद्वारे दिली जात होती. सध्या एनआयए टीम त्यांचा व्यवसाय आणि व्यवहाराशी संबंधित माहिती गोळा करत आहे.  दरम्यान, एनआयएने देशभरात ७६ ठिकाणी छापे टाकले असून, आतापर्यंत सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. यातून दोन कोटी ३० लाख रुपये जप्त करण्यात आले, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा