शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चितेवरुन बाहेर काढला अर्धवट जळालेला मृतदेह; हुंड्यासाठी सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 11:42 IST

हुंड्याच्या लालसेपोटी सासरच्यांनी मुलीची हत्या करून मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार सुरू केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

बिहारमधील मोतिहारमध्ये एका नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या लालसेपोटी सासरच्यांनी मुलीची हत्या करून मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार सुरू केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांच्या माहितीवरून ते स्मशानभूमीत पोहोचले आणि त्यांना पाहताच मुलीचे सासरचे लोक पळून गेले. 

कुटुंबीयांनी चितेतून अर्धवट जळालेला मृतदेह उचलला आणि हरसिद्धी अरेराज मुख्य रस्ता अडवला. सासरच्यांनी तिचे हातपाय बांधून गळा आवळून खून केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना समजावून सांगितले, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. फुलपरी देवी (20) असं मुलीचं नाव होतं. 

गरीब आईने मोठ्या कष्टाने आपल्या मुलीचे शिक्षण करून तिचे लग्न लावून दिले. मात्र हुंड्याच्या हव्यासाने तिचीही हत्या केली. मुलीची आई रामवती देवी यांनी सांगितले की, आपल्या मुलीचं लग्न 8 मार्च 2023 रोजी टोला गावातील रहिवासी सुभाष शर्मा यांचा मुलगा नितेश कुमार याच्याशी केले होते. लग्नानंतर त्यांची मुलगी सासरच्या घरी गेल्यापासून पाच लाख रुपये आणि बाईकसाठी तिचा छळ सुरू झाला. 

लग्नानंतर सहा महिन्यांनी नवऱ्याने तिला मारहाण करून आई-वडिलांच्या घरी पाठवले. काही वेळाने जावई नितेशकुमार आला आणि मुलीला घेऊन गेला. काही दिवसांनी मुलीवर अत्याचार करून तिला घराबाहेर हाकलून दिलं. आता माहिती मिळाली की मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला जात आहे. आम्हाला पाहताच सासरचे लोक तेथून पळून गेले. तेथे आम्ही चितेतून तिचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढला.

याप्रकरणी डीएसपी रंजन कुमार यांनी सांगितले की, मुलीच्या आईकडून तक्रार मिळाली आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या मुलीचे हात पाय बांधून हत्या केली आहे. याप्रकरणी महिलेचा पती, सासू, सासरे यांच्यासह अनेकांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी