शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

"पप्पा, नवऱ्याला बाईक दिली नाही तर तो मला..."; लग्नानंतर 6 महिन्यातच लेकीसोबत घडलं भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:18 IST

हुंड्यात बाईक न मिळाल्याने सासरच्या लोकांना राग आल्याचं सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. देवरिया येथे हुंड्याच्या हव्यासापोटी एका 21 वर्षीय नवविवाहित महिलेची हत्या करून मृतदेह नाल्याजवळील झुडपात फेकून फरार झाल्याची घटना घडली आहे. हुंड्यात बाईक न मिळाल्याने सासरच्या लोकांना राग आल्याचं सांगण्यात येत आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींच्या शोधात पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.

सोमवारी गौरीबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्दगोनिया गावातील नाकटा नाल्याजवळील झुडपात महिलेचा मृतदेह पाहून ग्रामस्थ हादरले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. काही लोक ट्रॅक्टरने आले आणि मृतदेह इथे टाकून पळून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपली मुलगी अर्चना हिचे लग्न 12 मे 2022 रोजी गौरी बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बांकी गावातील रहिवासी दुर्गेश चौहान याच्याशी केले होते. मात्र सासरच्या घरी पोहोचल्यानंतर मुलीवर बाईक आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. सासरच्या लोकांनी तिला बेदम मारहाण करून विविध प्रकारे अत्याचार केले. घटनेच्या 25 दिवस अगोदर ते मुलीच्या सासरच्या घरी जाऊन तिची तब्येत विचारण्यासाठी पोहोचला असता, मुलीने तिला झालेला त्रास सांगितला आणि रडू लागली. 

हुंडा म्हणून बाईक दिली नाही तर सासरचे लोक जीवे मारतील, असे तिने वडिलांना सांगितले. यानंतर त्यांनी मुलीच्या सासरच्या मंडळींना बाईक देण्यास सक्षम नसून आपल्या मुलीचा छळ करू नये, असे समजावून सांगितले. त्यानंतर ते गावी परतला. मात्र त्यानंतर त्यांच्या मुलीचा मृतदेह सापडला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी