शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'मार्केटमध्ये चला मला बांगड्या घ्यायच्या आहेत', पतीचा हात सोडून बॉयफ्रेन्डसोबत फरार झाली नवी नवरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 14:43 IST

Bride ran away with Boyfriend : तरूणी पतीला म्हणाली की, 'मार्केटमध्ये चला, मला बांगड्या आणि काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. पतीला तिला घेऊन मार्केटमध्ये गेला.

Bride ran away with Boyfriend : बिहारच्या (Bihar) मुंगेरमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे लग्नाच्या केवळ सात दिवसांनंतर एक नवविवाहित नवरी आपल्या प्रियकराचा हात पकडून रफूचक्कर झाली. हैराण करणारी बाब ही की, पतीसमोरच ही पूर्ण घटना घडली. पतीने तिला पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी चौकशी करत असलेल्या पोलिसांनी नव्या नवरीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

इथे पोद्दार कॉलनीमध्ये राहणाऱ्या सुरज कुमार(बदललेलं नाव) चं लग्न नौवागढी इथे राहणाऱ्या राणी(बदललेलं नाव) सोबत 14 जून रोजी झालं होतं. लग्नानंतर चार दिवस नवरी सासरी राहिली. त्यानंतर 18 जून रोजी ती तिच्या माहेरी गेली. 21 जूनला ती पुन्हा सासरी आली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 तारखेला प्रियकरासोबत फरार झाली.

तरूणी पतीला म्हणाली की, 'मार्केटमध्ये चला, मला बांगड्या आणि काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. पतीला तिला घेऊन मार्केटमध्ये गेला. पत्नी पतीला म्हणाली की, तुम्ही माझ्यासाठी बांगड्या पसंत करा. जसा पती बांगड्या बघू लागला, तशी तरूणी मागे वाट बघत असलेल्या प्रियकराचा हात पकडून पळून गेली. पतीने दोघांचा पाठलागही केला. पण तोपर्यंत दोघेही गाडीत बसून फरार झाले.

पीडित तरूण आई आणि बहिणीसोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलिसांना त्याने सांगितलं की, तो एका दुकानात बांगड्या खरेदी करत होता. तेव्हाच माझ्या पतीने दुसऱ्या तरूणाचा हात पकडला आणि रस्त्यावर उभी असलेल्या स्कॉर्पिओ गाडी बसून गेली. तिने यावेळी लग्नातील दागिनेही घातले होते आणि सोबत काही कागदपत्रही घेऊन आली होती. जे ती सोबत घेऊन गेली.

याप्रकरणी नवरीच्या सासूने सांगितलं की, आम्हाला एकच मुलगा आहे. मोठ्या आनंदाने त्याचं लग्न केलं. पण सून चुकीची निघाली. जर तिला तिच्या प्रियकरासोबत जायचंच होतं तर तिने लग्नच का केलं. आमच्या परिवारासोबत तिच्या परिवाराने दगा केला. आता आमची नामुष्की होत आहे. 

नवरीचा प्रियकर मनोज कुमार (बदललेलं नाव) म्हणाला की, 'मी व्यवसायाने ड्रायव्हर आहे आणि दुसऱ्याची गाडी चालवतो. आमच्यात गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू आहेत. पण प्रेयसीच्या घरचे लोक आमचं लग्न लावून देण्यास तयार नव्हते. जबरदस्ती तिचं लग्न दुसरीकडे केलं गेलं. त्यानंतर ती सासरहून फोन करून सतत रडत होती आणि जीव देण्याचं बोलत होती. त्यानंतर आम्ही पळून बेगूसरायला गेलो आणि आज नौवागढीला आलो. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी