आपली गर्लफ्रेंड कुण्या दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने प्रेमभंग झालेल्या एका तरुणाने आपल्या गर्लफेण्डच्या नव्या बॉयफ्रेण्डला धमकावण्यासाठी अंधेरीतील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या फिल्मी प्रकरणात वर्सोवा पोलिसांनी हवेत गोळीबार करणाऱ्या अल्ताफ हुसैन सय्यद (36) आणि वसीम शेख, (30) या दोघांना अटक केली. या दोघांना २७ डिसेंबर रोजी माहीम बीच येथून अटक करण्यात आली असून दोघांना न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वरुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. आरोपी अल्ताफचे एका 35 वर्षीय महिलेसोबत गेले 8 वर्षे प्रेमसंबंध होते. एका वर्षापूर्वी या दोघांत काटक्यांचे भांडण झालं आणि त्यांचे ब्रेक अप झाले. या दरम्यान त्या महिलेचा संबंध वर्सोवा येथे राहणाऱ्या एका उद्योगपतीशी आला आणि याबाबत एक्स बॉयफ्रेंडला माहिती कळताच तो भडकला आणि २६ डिसेंबरच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अल्ताफ आपला मित्र वसिमला घेऊन वर्सोव्यातील त्या उद्योगपतीच्या घरी पोहचला. तेथे गेल्यानंतर त्याला समजलं तो उद्योगपती लोणावळा येथे गेला आहे. त्यावेळी आरोपीने उद्योगपतीच्या दोघा भावांना इमारतीखाली बोलावून धमकावलं. नंतर हवेत गोळीबार केला. नंतर त्यांनी या घटनेची माहिती वर्सोवा पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी अल्ताफ आणि त्याच्या मित्राचा शोध सुरु केला. हे दोघेही माहीम परिसरात राहणारे असून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन मोबाइल टॉवरच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना माहिममधून अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी गावठी कट्टा जप्त केला. हा गावठी कट्टा आरोपीकडे कसा आला याचा पोलीस तपास करत आहेत.
प्रेयसीच्या जीवनात नवा प्रियकर आला; धमकावण्यास एक्स बॉयफ्रेण्डने हवेत गोळीबार केला
By पूनम अपराज | Updated: December 29, 2020 21:43 IST
Crime News : माहीम बीच येथून अटक करण्यात आली असून दोघांना न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वरुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
प्रेयसीच्या जीवनात नवा प्रियकर आला; धमकावण्यास एक्स बॉयफ्रेण्डने हवेत गोळीबार केला
ठळक मुद्देया फिल्मी प्रकरणात वर्सोवा पोलिसांनी हवेत गोळीबार करणाऱ्या अल्ताफ हुसैन सय्यद (36) आणि वसीम शेख, (30) या दोघांना अटक केली.